आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Girls Trying To Suicide At Civil Hospital At Solapur

सिव्हिलमध्ये तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न,डॉक्टरांवर कारवार्इची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- डॉक्टरास मारहाण झाली म्हणून पोलिसांवर कारवाई झाली, पण डॉक्टरने उद्धट वर्तन केले म्हणून त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न करत कविता चव्हाण या तरुणीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुमारे 30 मिनिटे हा प्रकार सुरू होता. तुमच्या भावना वरिष्ठांना कळवू, असे आश्वासन दिल्यानंतर चव्हाण हिने माघार घेतली.

मंगळवारी साडेअकराच्या सुमारास चव्हाण हिने शासकीय महाविद्यालयाचे प्रवेशद्वार बंद असल्याने संरक्षक भिंतीवरून उडी मारून आता प्रवेश केला. पोलिसांचीही धावपळ झाली आणि तिला महिला पोलिसांनी पकडले. या सर्व गोष्टींना डीनच जबाबदार आहेत, सहा वर्षांत त्यांची बदली झाली नाही, त्यांची बदली त्वरित व्हावी, अशा मागण्या चव्हाण हिने केल्या. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बोलता येत नाही. सीआयडी चौकशी चालू आहे. त्यांना सर्व माहिती दिली आहे. डॉ. प्रशांत पाटील यांच्या निलंबनाबाबत वरिष्ठांना कळवले आहे, असे अधिष्ठाता शिंदे यांनी सांगितले.