आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज एक लाख समोशांची विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दहा ते अकरा लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहरात रमजानच्या इफ्तार निमित्त दररोज संध्याकाळी एक लाख समोशांची विक्री होत असून लाखोंची उलाढाल होत आहे, अशी माहिती होलसेल व्यापारी अ.जब्बार शाबाद यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

इफ्तार म्हटले की विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आलेच. इफ्तार करण्यासाठी बाजारात खजूरपासून मांसाहर पदार्थांपर्यंत अनेक वस्तू विक्रीला येतात. मात्र, शहरात समोशाला खूपच मागणी आहे. शहरात समोसा विक्री करणारे दहा ते बारा होलसेल व्यापारी आहेत. या व्यापार्‍यांकडून समोसा घेऊन विक्री करणारे सुमारे 200 विक्रेते आहेत. रमजाननिमित्त मागणी वाढलेली असते.

होलसेल विक्री
एका होलसेल व्यापार्‍यास दररोज दीडशे कि लो कांदा, दीडशे कि लो मैदा, 45 किलो तेल आदी पदार्थ लागतात. काही लोक घरगुती स्वरूपात समोसे तयार करतात. एका व्यापार्‍याकडून दररोज बारा ते पंधरा हजार समोसे विकले जातात. या काळात रोजगाराबरोबरच मोठी उलाढाल होते.

रमजाननिमित्त वाढली मागणी
आमच्यासारखे होलसेल व्यापारी दहा ते बारा आहेत. एका व्यापार्‍याकडून सुमारे दहा हजार समोसे दररोज विकले जातात. दररोज शहरातून एक लाख समोशांची विक्री होते. किरकोळ व्यापार्‍यांची संख्या 200 वर आहे. अ.जब्बार शाबाद, होलसेल व्यापारी

समोसाचे दर
कांदा समोसे- 40 रुपये डझन
खिमा समोरे- 70 रुपये डझन
चिकन समोसे- 90 रुपये डझन
खवा समोसे- 120 डझन