आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींच्या साक्षीने वारकऱ्याचे ‘हे राम’, घेतला गळफास?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरातीलरेल्वे स्टेशनजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला जणू साक्षी ठेवूनच एका वारकऱ्याने अखेरचा निरोप घेतल्याचे शुक्रवारी सकाळी वाजता उघडकीस आले. गांधीजींच्या पुतळयानजीक डोके मान असा तिरकस कापडापासून तयार केलेल्या दोरीच्या फासात लटकलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल उपलब्ध नाही, परंतु फास घेऊन व्यक्तीने आत्महत्या केल्याची पोलिसात नोंद झाली आहे.
घटनास्थळापासून पोलिस चौकी पन्नास फूट, रेल्वे स्टेशन सत्तर फूट तर सिटीबसस्थानक चाळीस फुटांवर आहे. दिवस-रात्र मालट्रक, राज्य परिवहनच्या बस, सिटीबस, रिक्षा, दुचाकी वाहने गांधी पुतळ्याला वळसा घालूनच ये-जा करतात. परंतु हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडताना अथवा घडल्यानंतरही तातडीने कोणाच्या लक्षात आली नाही, हे विशेष. आत्महत्याच करायची तर या व्यक्तीने गांधीजींच्या पुतळ्याचे स्थळ का निवडले हा प्रश्न आहे.

शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिडीला पांढरी दोरी लटकत असल्याचे एका रिक्षाचालकाने पाहिले. संशयामुळे त्याने कठड्यावर चढून पाहिले असता एक व्यक्ती गळफास घेतलेल्या स्थितीत लटकत असल्याचे दिसले. त्यांनी स्टेशन पोलिस चौकीत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली. गळफास सोडवून शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर मृत घोषित केले.
प्रसाद गृहातील पावतीमिळाली
पाच-सहादिवसांपासून ती व्यक्ती स्टेशन परिसरात फिरत होती. पैसे, जेवण लोकांना मागत असल्याचे काहीनी सांगितले. मृत व्यक्तीच्या गळ्यात तुळशीची माळ, दाढी वाढलेली. अंगावर पांढरे कपडे. पिशवीत बुक्का, गंध सोबतच भगवी पताका आहे. नावाचा गावचा काहीच पुरावा नसल्यामुळे ओळख पटली नाही. कोल्हापूर महालक्ष्मीच्या प्रसाद गृहातील पावतीही सापडल्याचे पाेलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले.
सार्वजनिकठिकाणी घटनांची वाढ
प्रशासकीयमध्यवर्ती कार्यालय, दक्षिण पंचायत समितीचे पाणीपुरवठा कार्यालय प्रवेशव्दार. काही वर्षांपूर्वी जिल्हा न्यायालयासमोरील झाडाला तरुणाने गळफास घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. महापुरुषांच्या पुतळ्यानजीकची अलीकडच्या काळातील पहिलीच घटना असावी.