आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One More Train To Pune, Efforts For Jhelam Express In Solapur

पुण्यासाठी आणखी एक गाडी मिळण्याची आशा, झेलम एक्स्प्रेस सोलापूरला आणण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हुतात्मा,इंद्रायणी एक्स्प्रेसनंतर आता सोलापूर-पुण्यासाठी आणखी एक गाडी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे-जम्मूतवी एक्स्प्रेस गाडीचा रेक (डब्बे) २७ तास देखभालीसाठी असतो. हाच रेक पुढे सोलापूरपर्यंत पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ही नवी गाडी सुरू झाल्यास पुण्याकडे जाणा-या प्रवाशांची सोय होणार आहे.
सोलापूरहून पुण्याला जाणा-या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच धर्तीवर सोलापूर-पुणे आणखी एक गाडी सुरू करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने सुरू केला. पुणे-जम्मूतवी झेलम एक्स्प्रेस पुण्याहून धावते. या एक्स्प्रेसचा रेक पुणे स्थानकावरील यार्डात देखभालीसाठी २७ तास उभा असतो. पुणे स्थानकावरील गाड्यांची वर्दळ पाहता रिकामे रेक आणि देखभालीसाठी अडचण निर्माण होत आहे. रेक उभे करण्यासाठी यार्डातही जागा मिळत नाही. त्यामुळे या रेकचा उपयोग करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे झेलम एक्स्प्रेसचा रेक सोलापूरला पाठवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

झेलम एक्स्प्रेसही पुण्याहून दररोज सायंकाळी वाजून २० मिनिटांनी निघते आणि जम्मूतावीला सकाळी १० वाजता पोहोचते. आणि जम्मुतावीहून रात्री वाजून ४५ िमनिटांनी निघते. पुण्याला दुपारी वाजून १० मिनिटांनी पाेहोचते. पुणे ते जम्मूतावीचा प्रवास ४० तास ४० मिनिटांचा आहे. झेलम एक्स्प्रेसचे एकूण रेक उपलब्ध आहेत. यातील रेक २७ तास पुण्यात विनाकारण थांबून असतो. एवढा मोठा वेळ गाडी थांबून ठेवण्यापेक्षा ही गाडी पुढे सोलापूरला सोडण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. रेल्वेच्या लेखापरीक्षण विभागाने तसा अहवालही मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे दिला आहे. त्यावर लवकरच सकारात्मक िनर्णय अपेक्षित आहे. तसे झाल्यास सोलापूर ते पुणेसाठी दरराेज धावणा-या गाड्यातआणखी एका गाडीची भर पडणार आहे.

सोलापूर महत्त्वाचे जंक्शन
सोलापूररेल्वे स्थानकावरून धावणा-या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे सोलापूर शहर देशातील महत्त्वाच्या शहरांशी जाेडले गेले आहे. यात मुंबई, पुणे, बंगळुरू, म्हैसूर, यशवंतपूर, हैदराबाद, सिकंदराबाद, कन्याकुमारी, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, राजकोट, दिल्ली, भोपाल, बनारस, जयपूर, तिरुपती, नागपूर, तिरुअनंतपूरम आदी प्रमुख शहरांचा समावेश आहे.

नवी राज्ये जोडण्याची आहे गरज...
उत्तरभारतातील जम्मू-काश्मीर, पंजाब, पश्चिम बंगाल, गोवा आदी राज्यांना जोडण्यासाठी दौंड मार्गाचा उपयोग होऊ शकतो. गोवा, कोकणसारख्या प्रदेशास सोलापूर विभागातील मिरज स्थानकावरून गाडी जाऊ शकते.

अहवाल मुख्यालयाकडे दिला
पुण्यातीलवाढती गाड्यांची संख्या यार्डमधील अपुरी जागा लक्षात घेता झेलम एक्स्प्रेसचा रेक मेंटनन्ससाठी सोलापूरला पाठवून द्यावा, असा अहवाल दिला आहे. मुख्यालय यावर सकारात्मक निर्णय घेऊन दोन ते तीन महिन्यांत ही गाडी सुरू करणार आहे.” यू.एन. भगरे, वरिष्ठ लेखापरीक्षक, पुणे विभाग, सोलापूर.

वर्षांत सोलापुरातून
धावणा-या गाड्या

सोलापूर-मुंबईएक्स्प्रेस(मिनी सिध्देश्वर), सोलापूर-यशवंतपूर एक्स्प्रेस, सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर-हुबळी एक्स्प्रेस, आदी प्रमुख गाड्यांचा गेल्या पाच वर्षांत सोलापुरातून धावत आहेत.