आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमेत सोडले उजनीतून एक टीएमसी पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईचे संकट आहे. उजनी धरणातून आषाढी वारीसाठी एक टीएमसी पाणी भीमापात्रात सोडले आहे. धरणात सध्या वजा 24 टक्के इतकाच जलसाठा उरला आहे. उर्वरित पाणी आता केवळ पिण्यासाठीच राखून ठेवावे लागणार असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होईल.

जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. पण वरील धरणाच्या परिसरातही (पुणे जिल्ह्यात) म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मुंबई, पुणेवर पाणी कपातीचे संकट आले आहे. मान्सूनचे आगमन झाले आहे पण प्रत्यक्ष पावासने दडी मारली आहे. गेल्या वर्षी उजनी धरण 100 टक्के भरले होते.
वर्षभराच्या पाणी वापर नियोजनांतर धरणात वजा 24 टक्के इतका जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सिंचनासाठी नदीतून पाणी सोडण्याची शक्यता धुसर झाली आहे. जर पाणी सोडावेच लागले तर मुख्यमंत्र्यांची विशेष परवानगी घ्यावी लागेल. आषाढीसाठी पंढरीत येणा-यांना वारक-यांची सुविधा म्हणून चंद्रभागेत (भीमा) एक टीएमसी पाणी सोडले आहे. बुधवारी 3 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला.

पाणीटंचाईचे संकट
उजनी धरणातील पाण्याचे नियोजन सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती लक्षात घेऊन 15आॅक्टोबर दरम्यान केले जाते. सप्टेंबरपर्यंत जर पुरेसा पाऊस झालाच नाही तर पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. सोलापूर शहराला यशवंत जलाशय योजनेतून मिळणा-या पाण्यावरच अवलंबून राहावे लागेल. शेतकरी पिकांसाठी तर शहरातील नागरिक पिण्यासाठी पावसाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

15 ऑक्टोबरला नियोजन
४उजनी धरणातील पाणी सोडण्याचे वर्षभराचे वेळापत्रक पूर्ण झाले आहे. आता सप्टेंबरपर्यंतचा अंदाज घेऊन 15 ऑक्टोबरला त्याचे नियोजन होईल. पाण्याची पातळी पाहून पिण्यासाठीच ते राखून ठेवायचे का? याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. शेतीसाठी तर पाणी बंदच केले आहे.
अजय दाभाडे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा