आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Time Setelmentdemand For Cotton Industri Comapnay Solapur

यंत्रमाग सहकारी संस्थांना ‘ओटीएस’ द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - यंत्रमाग सहकारी संस्थांना ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ (ओटीएस : वन टाइन सेटलमेंट) देण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिल्याची माहिती वस्त्रोद्योग खात्याचे प्रादेशिक उपसंचालक अशोक भांडवलकर यांनी गुरुवारी दिली. ज्या संस्थांनी शासकीय भागभांडवल घेतले आणि राष्ट्रीय सहकारी महामंडळाकडून कर्जे घेतली, त्यांच्याकडील रकमेची वसुली करण्यासाठी ही योजना गरजेची असल्याचे ते म्हणाले.

शहर आणि जिल्ह्यातील 33 संस्थांकडे 20 कोटी रुपयांच्या रकमा थकीत आहेत. त्याच्या वसुलीला प्रतिसाद नाही. पण, इचलकरंजीतल्या संस्थांकडून मात्र चांगला प्रतिसाद मिळतो. ‘ओटीएस’ दिल्यास पूर्ण रक्कम एकवट भरणार असल्याचे काही संस्थाचालकांनी सांगितले. सोलापुरातील संस्थाही याबाबत अनुकूल आहेत. त्याचा विचार करूनच याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला, असेही श्री. भांडवलकर म्हणाले. वसुलीची जबाबदारी सहकारी संस्थांचे निबंधक आणि वस्त्रोद्योग खात्याकडे आहे. मार्च महिना आला की दिलेल्या उद्दिष्टासाठी जुजबी वसुली होत असते. 31 मार्चपर्यंत वस्त्रोद्योगकडे शून्य तर शहर निबंधक कार्यालयाकडे केवळ 28 लाख रुपयांच्या वसुलीची नोंद आहे. याबाबत संस्थाचालकांना विचारले असता, प्रत्यक्ष रकमेपेक्षा अधिकार्‍यांना पोसणे कठीण झाले आहे.

शासनस्तरावर लवकरच होईल बैठक
राज्यातील सर्वच यंत्रमाग संस्थांना ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ देण्यासंबंधी शासनाने लवकरच बैठक घेण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच ही बैठक अपेक्षित आहे. त्यानंतर शासन निर्णय जाहीर झाल्यास ही योजना राबवून संस्थांकडून रकमांची वसुली करता येईल.’’ अशोक भांडवलकर, उपसंचालक, वस्त्रोद्योग