आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत चित्रपटगृहासमोरील एकेरी नियमाचा अंमल सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भागवत चित्रपटगृहासमोरील एकेरी मार्गावर नियम मोडणार्‍या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी रविवारी दंडात्मक कारवाई केली. मोठय़ा फौजफाट्यासह कारवाई सुरू होती. ती अचानक सुरू झाल्याने नेमके काय होत आहे, हे वाहनचालकांना कळत नव्हते.

सायंकाळी रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ओघ असतो. त्यात ही कारवाई सुरू झाली. त्यामुळे या रस्त्यासह हॉटेल स्नो मॅन्ससमोरील रस्ता आणि मनोज लॉजवरून मेकॅनिकी चौकात येणार्‍या एकेरी मार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली. कारवाईची पुरेशी पूर्वसूचना दिलेली नव्हती. शिवाजी चौक (पांजरपौळ) ते मॅकॅनिक चौक हा रस्ता एकेरी आहे. त्याचे पालन न करण्याचा शिरस्ता गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू होता. रविवारी मात्र एकेरीचा नियम मोडणे वाहनचालकांना महागात पडले. सुमारे 80 दुचाकी, 50 चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. काही नागरिकांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे राग व्यक्त केला. आजपासून ही कारवाई मोहीम नियमित राहील, असे स्पष्ट आदेश सहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्राम यांनी दिले आहेत.

सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत (सिटी बस सोडून) शिवाजी चौकातून नवी वेस पोलिस चौकीकडे जाण्यासाठी मनोज लॉजसमोरील मार्गावरून जाण्यास मुभा आहे. एसटी बस, अवजड वाहने हॉटेल सुप्रभात ते बिराजदार हॉस्पिटल, पवार महाविद्यालय, कल्पना टाकीज या मार्गे ये-जा करण्यासाठी मुभा आहे. दरम्यान, श्री. आत्राम, निरीक्षक शिर्के, सहाय्यक निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह चार फौजदार, 25 कर्मचारी यांनी सायंकाळी सहा ते नऊ यावेळेत मोहीम राबवून कारवाई केली.