आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप सरकारची वर्षपूर्ती, आता जनकल्याण पर्व सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर- स्वच्छ भारत अभियान, रोजगार निर्मिती, जन-धन योजना, पंतप्रधान विमा योजना, शेतकऱ्यांचा विकास याबरोबर भ्रष्टाचारमुक्त प्रशासन केंद्रातील भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिले. आता समृद्ध भारताच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनंतर आता जनकल्याण पर्व सुरू करणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या वर्षभरातील विकासकामांची आमदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, "केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना वर्षभरात सुरू केल्या. विविध प्रकल्प सुरू करताना सर्वसामान्य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले. सरकारच्या या चांगल्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी. यासाठी जनजागृती अभियान प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही गावागावात जाणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे डिजिटल फलक होटगीत लावले. त्याचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच केंद्र राज्य सरकारचे मंत्री, खासदार आमदार आपापल्या मतदारसंघात जाऊन केंद्र सरकारच्या कामाची जनतेला माहिती देणार आहेत.'
देशमुख म्हणाले, "गरिबांना सामाजिक सुरक्षा नव्हती. जन-धन योजनेमुळे १४ कोटी गरिबांची बँकेत खाती उघडली. ३३० रुपये भरल्यानंतर पंतप्रधान विमा योजनेतून दोन लाख रुपये मिळतील. मासिक २१० रुपये भरल्यास वयाच्या ६० वर्षांनंतर गरिबांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. शेतजमिनीची गुणवत्ता सुधारल्याशिवाय शेतीचे उत्पन्न वाढणार नाही.
त्यासाठी माती परीक्षण करण्यात येईल. युरियाची उपलब्धता वाढवणे काळाबाजार रोखण्यासाठी धोरण आखले आहे. यामुळे पाच वर्षे सध्याच्या दरातच शेतकऱ्यांना युरिया मिळेल. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून पाण्याची पातळी वाढवण्याची कामे होत आहेत. एकूणच केंद्र सरकारच्या योजनांचा थेट गरिबांना लाभ व्हावा. त्यांचा विकास झाला पाहिजे, हेच भाजप सरकारचे धोरण आहे.'
मोदी सरकारचे नव्हे, काँग्रेसचेच श्राद्ध
काँग्रेसपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोदी सरकारचे श्राद्ध घातले जात आहे. या प्रश्नावर आमदार देशमुख म्हणाले, "हे श्राद्ध मोदी सरकारचे नाहीच. वर्षापूर्वीच काँग्रेस संपली. त्यामुळे त्याचवेळी श्राद्ध घालायला हवे होते. ते वर्षानंतर घालत आहेत. हे काँग्रेस पक्षाचेच श्राद्ध आहे.'
माहिती देण्यासाठी लोकप्रतिनिधी फिरणार
पंतप्रधानमोदी यांच्या कामाची माहिती देण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोडे, अमर साबळे जेथे आमचे आमदार नाहीत तेथे भाजपचे नेते िफरतील. माझ्याकडे दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुके असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.