आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकर वसुलीसाठी पालिकेची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ओंकारा कन्स्ट्रक्शनने शुक्रवारपर्यंत 71 लाख रुपये जमा न केल्यास महापालिका पथकर (एस्कॉर्ट) वसूल करणे सुरू करणार आहे. त्याची तयारी झाली असल्याची माहिती उपायुक्त पी. वाय. बिराजदार यांनी गुरुवारी दिली.
महापालिकेने नाक्यांवरील पथकर वसुलीचे खासगीकरण केले. एप्रिलमध्ये याचा मक्ता ओंकारा कन्स्ट्रक्शनने घेतला होता. दर आठवड्यास दहा लाख रुपये महापालिकेकडे जमा करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे कंपनीने रक्कम जमा केली नाही. त्यांच्याकडे एक कोटी 85 लाख रुपये थकीत आहेत. कराराप्रमाणे कंपनीने तीन कोटी 70 लाखांची बँक हमी दिली होती. थकीत रक्कम दोन कोटी झाल्यास करार रद्द होतो, अशी तरतूद आहे. महापालिकेने हमीतून थकीत वसुली केली आहे. 71 लाख रुपये भरण्यासाठी शुक्रवारपर्यंतची मुदत दिली होती. रक्कम न भरल्यास त्याच्या मध्यरात्रीपासून महापालिका वसुली सुरू करेल. सामान्य प्रशासनाने कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
तर वसुली सुरू करू - एस्कॉर्टचा मक्ता मक्तेदारांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास संपुष्टात येऊ शकतो. मध्यरात्रीपासून मनपा एस्कॉर्ट वसुली सुरू करेल. त्यानुसार पुस्तक छपाई, कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे.’’ पी. वाय. बिराजदार, उपायुक्त