आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीत येणार फक्त 1.75 टीएमसी पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पाच दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील आंद्रा व भामा आसखेड धरणांतून गाजावाजा करून उजनी धरणासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याने 85 किलोमीटर अंतर कापले आहे. पाण्याचा आणखी सुमारे 140 किलोमीटरचा प्रवास बाकी असून बाष्पीभवन आणि पाणी मुरण्याचा वेग लक्षात घेता उजनी धरणात पाणी पोचण्यासाठी आणखी 5-7 दिवसांचा कालावधी लागेल. शिवाय, फक्त पावणेदोन टीएमसी पाणी येथे दाखल होणार असल्याने सोलापूरकरांचा भ्रमनिरासच होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील दोन धरणांतून 10 एप्रिलपासून पाणी सोडण्यास सुरवात झाली. एकूण 4 टीएमसी पाणी उजनीसाठी सोडले जाणार असले तरी जेमतेम पावणेदोन टीएमसी पाणीच प्रत्यक्ष उजनीत पोहचेल. पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी ही माहिती दिली. हायकोर्टाच्या दणक्यानंतर हे पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

कालव्यांना पाणी नाही
उजनीतून डाव्या-उजव्या कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी पुढे येत आहे. उजनीतील पाण्याची तळपातळी 487.2 मीटर आहे. सध्याची पाणीपातळी 488 मीटर आहे. डाव्या-उजव्या कालव्यांची तळातील रुंदी जास्त असल्याने या कालव्यांमध्ये पाणी सोडणे केवळ अशक्य असल्याचा अहवाल उजनीच्या अभियंत्यांनी दिला आहे. त्यामुळे या कालव्यांना उजनीतून पाणी शक्य होणार नाही.