आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only Three Million People Will Adhar Card Number By March

केवळ तीन लाख जणांना मार्चपर्यंत मिळेल आधार कार्ड क्रमांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-गॅस अनुदान मिळण्यासाठी बंधनकारक केल्याने नागरिकांमध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी केंद्रांवर झुंबड उडाली आहे. मात्र, उपलब्ध यंत्रणेत 31 मार्चपर्यंत तीन लाख 40 हजार लोकांना कार्ड मिळू शकेल. राहिलेल्या 26 लाख 9 हजार जणांचेही मुदतीत कार्ड बनवण्यासाठी आणखी 800 मशीन लागणार आहेत. सध्या तरी ही गोष्ट प्रशासनस्तरावर अशक्य असल्याचे दिसून येत आहे.

सर्वोच्च न्यायालय शासकीय कामासाठी आधार क्रमांकाची सक्ती न करण्याचा आदेश दिला आहे. याविषयी केंद्र सरकारने भूमिका न घेतल्याने सरकारी बाबूंचीही चांगलीच अडचण झाली आहे. दुसरीकडे राज्यस्तरावरून आधार कार्ड काढण्याची जबाबदारी दिलेल्या कंपनीने पुरेशी यंत्रणा उपलब्ध केलेली नाही. आतापर्यंत केवळ 50 टक्के लोकांना आधार क्रमांक मिळू शकला.

नोंदणी केंद्रावर लोकांची झुंबड उडाली आहे. मक्तेदार खासगी कंपनी, जिल्हा प्रशासन आणि महापालकिा प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे वारंवार समोर आले आहे. केंद्र सुरू असल्याचे ठिकाण प्रशासनाने सांगितले, तेथे केंद्रच नसल्याचे दिसून आले आहे. चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्याने नागरिकांना हेलपाटे घडले.

बैठकीत प्रस्ताव ठेवणार

गॅस वितरकांकडे नोंदणी केंद्र सुरू केल्यास गॅस ग्राहकास आधार कार्ड मिळणे सुलभ होणार असल्याची सूचना आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांसोबत होणार्‍या बैठकीत चर्चा करून याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.’’ दिनेश भालेदार, अन्नधान्य वितरण अधिकारी

मशीनची संख्या 125 वर

‘दिव्य मराठीत’ (16 जानेवारी) 55 टक्केनागरिकांना आधार क्रमांक मिळालेला नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आधार कार्ड काढणार्‍या संचात वाढ झाली आहे. शहरात 9 ठिकाणी 12 संच बसवण्यात आले आहेत. तर ग्रामीणमध्ये 84 ठिकाणी संच आहेत. स्पॅन्को कंपनीकडून 29 महा ई-सेवा केंद्रातून काम सुरू आहे. उत्तर सोलापूर 5, दक्षिण सोलापूर 2, पंढरपूर 11, माळशिरस 13, सांगोला 3, करमाळा 8, मोहोळ 8, अक्कलकोट 1, मंगळवेढा 6, माढा 23 व बार्शी 3 असे 84 ठिकाणी खासगी कंपनीकडून आधार केंद्र सुरू आहेत.

एका दिवसात किमान 50 नोंदणीचे लक्ष्य

राज्य शासनाकडूनच एका दिवसात (8 ते 10 तास) एका मशीनवरून किमान 50 नागरिकांची नोंद करण्याचे लक्ष्य दिले आहे. जिल्ह्यात सध्या 100 मशीन आहेत. त्याद्वारे रोज 5 हजारप्रमाणे येत्या 68 दिवसांच्या मुदतीत तीन लाख 40 हजार नागरिकांना आधार कार्ड मिळू शकेल. उरलेल्यांना मार्चनंतरच कार्ड मिळेल.

साडेएकवीस लाख जणांनी काढले

जिल्ह्यातील 47 लाख 65 हजार 289पैकी 26 लाख 9 हजार 366 जणांना आधार कार्ड मिळाला आहे. यात शहरातील 14 लाखांपैकी सात लाख 11 हजार तर ग्रामीणमध्ये 33 लाख 66 हजारपैकी 14 लाख 44 हजार नागरिकांनी आधार कार्ड काढले आहे.