आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बीएमआयटी'च्या विद्यार्थ्यांना सिंगापूर येथे संशोधनाची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ब्रह्मदेवमाने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने सिंगापूरमधील दोन विद्यापीठांशी करार केला आहे. प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी माहिती देताना सांगितले की, बीएमआयटी या संस्थेचे सिंगापूरस्थित नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट सिंगापूर यांच्याबरोबर हा सामंजस्य करार झाला असून, याद्वारे विद्यार्थी तेथील अद्ययावत प्रयोगशाळांचा वापर संशोधनासाठी करू शकतात.
तसेच शिक्षण संशोधनाची देवाण-घेवाणही करता येणार आहे. यावेळी एनयूएसचे वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. एम. व्ही. रेड्डी यांच्याबरोबर सामंजस्य करारावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांना सिंगापूर एमआयडीसीमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. यातील पहिली बॅच २०१५ मध्ये सिंगापूरलाही जात असल्याचे ते म्हणाले.
१८ १९ जून रोजी इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च सिंगापूर यांनी ही कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यात विविध देशांतून रिसर्च पेपर सादर झाले. बीएमआयटीचे डॉ. बी. एन. मोरे हे नोट स्पिकर होते. त्यांनी ट्रॅडिशनल ग्राउंड सर्चिंग सायंटिफीक अॅप्रोच या संशोधनावर, प्रा. रश्मी गवळींनी रोल ऑफ अप्लाइड अरगॉनॉमिक्सवर तर विद्यार्थिनी प्राची शिरसीकर प्रा. सीमा शिरसीकर यांनी अॅडव्हान्स टेक्निक फॉर एनर्जी चार्जेस ऑप्टीमायझेशन, मिथिला धेंडे हिने स्मॉल स्केल टेक्स्टाइल डस्ट कलेक्टर या विषयावर पेपर सादर केले. पत्रकार परिषदेस डॉ. बी. एम. मोरे, एस. जी. शिरसीकर, आर. एस. गवळी, प्रा. आर. आर. पाटील पी. जी. शिरसीकर उपस्थित होते.
- सिंगापूरमध्ये संशोधन आणि शिकण्याची सोय ही नामी संधी आहे. शिक्षण करता करता त्यांच्या प्रयोगशाळांचा वापर ही एक भेटच म्हणावी लागेल. यामुळे थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी लाभली आहे.
डॉ. बी. एम. मोरे
बातम्या आणखी आहेत...