आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opposition Victim In District Planning Committee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘डीपीसी’मध्ये सत्तावर्गापेक्षा विरोधकांचेच बळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हानियोजन समितीची चालू वर्षातील पहिली बैठक राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. रोजी होत आहे. बैठकीमध्ये समितीचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख नारायण पाटील वगळता सर्वच निमंत्रित सदस्य विरोधी पक्षाचे आहेत. समितीचे सदस्य असलेले झेडपी पालिकांचे प्रतिनिधीही संख्येने विरोधकांचे अधिक आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासमोर नियोजनाचे मोठे आव्हान असणार आहे.
जिल्हा परिषद, महापालिका नगरपालिका हे नियोजन समितीचे निर्वाचित सदस्य आहेत. जिल्ह्यातील सर्व आमदार हे निमंत्रित सदस्य आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक चालणार आहे. बैठकीत विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीच्या बैठकांमध्ये सत्ताधारी अधिक विरोधक कमी अशी स्थिती होती. आता नेमकी उलट स्थिती आहे. या बैठकीत सर्वाधिक अधिकार सदस्यांना असले तरी ते चिडीचूप असतात. निमंत्रित सदस्यांचाच बोलबाला सुरू असतो. त्यामुळे शनिवारच्या पहिल्या सभेकडे लक्ष लागले आहे.

निमंत्रितम्हणून यांची उपस्थिती : खासदारविजयसिंह मोहित शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, आमदार दिलीप सोपल, भारत भालके, प्रणिती शिंदे यांच्यासह सर्वच विद्यमान आमदार बैठकीला निमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित राहतील. यावेळी मृदू मितभाषी स्वभावाचे विजयकुमार देशमुख सदस्यांना सोबत घेऊन समितीचा कारभार कसा करतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पुढील वर्षीच्या नियोजनावर होणार निर्णय
पालकमंत्रीविजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत पुढील वर्षीचा नियोजन आराखडा अंतिम केला जाणार आहे. लहान गटाच्या बैठकीत काही विभागांच्या निधींना कात्री लावण्यात आली आहे, तर काही विभागांचा निधी वाढवण्यात आला आहे. समिती सदस्यांना विश्वासात घेऊन निधीचे नियोजन करणे अपेक्षित असते, परंतु जुनी पद्धत सभागृहात आराखडा मांडायचा आणि मंजुरी घ्यायची. त्यामुळे ‘सबकी साथ सबका विकास’ असे होणार की पूर्वी प्रमाणे ‘जिसकी भैस उसकी लाठी’ असा प्रश्न आहे.

मोहोळआमदारांकडेही राहणार लक्ष
जाहीरसभेत जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांना शिवीगाळ केलेले मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्या भूमिककडेही या बैठकीत लक्ष राहील. ते विस्फोटक विधान करण्याची शक्यता नाकारता येत नाही.