आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्किडियन्सने बनवला सौरकुकर, दहा-बारा मिनिटांत इडली होते तयार, रात्रीही चालतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिवसभराच्या सौरऊर्जेवर रात्री वापरले जाणारे इडली बनण्याचे अनोखे उपकरण बनवले आहे नागेश करजगी आर्किड अभियांत्रिकीतील विद्यार्थी के. एस. बेळ्ळे, आर. आर. ननवरे, आर. एन. चौगुले, एम. सी. नवले, एम. आर. उदगिरी यांनी. प्रा. सी. व्ही. पापडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण बनवले.

गॅस सिलिंडरमध्ये होणारी सततची दरवाढ, वाढती लोेकसंख्या, विजेचा लपंडाव आणि गॅस, रॉकेल इंधन ज्वलनामुळे तयार होणारे कार्बन डायऑक्साइड, मोनोक्साइड वायू, याचा श्वसनावर होणारा परिणाम पाहता सौर ऊर्जेवरचे हे उपकरण बनवले.

सोलापुरात वर्षातील दहा महिने उन्हाळा असल्याची ओळख आहेच. यामुळे विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारे हे उपकरण बनवले. हे उपकरण सरासरी १० ते १३ मिनिटे सौरऊर्जेचा वापर करून इडली तयार करते. साधारण गॅसवर लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळ या उपकरणाद्वारे लागतो.

सौरऊर्जा परावर्तीत करण्यासाठी पॅराबोलिक सोलर या परावर्तकाचा वापर केला. जास्तीत जास्त सौरऊर्जा साठवण्यासाठी सोयाबीन या खाद्यतेलाचा वापर केला. यामुळे सूर्यास्तानंतर देखील तीन तास हे उपकरण वापरता येईल. इडलीसोबत भात, ढोकळा, दाळ आदी पदार्थही शिजवता येतील. या प्रकारचे उपकरण बाजारात उपलब्ध नाही. हे उपकरण हॉटेल व्यावसायिकांसह वृद्धाश्रम, आश्रमशाळा, वसतिगृह, अंगणवाड्या या संस्थांनाही उपयुक्त ठरेल.
नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारा कुकर बनविला. हा कुकर सूर्यास्तानंतरही तीन तास कार्यान्वित राहू शकतो.