आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organized Siddheshwar Yatra Cause Various Religious Activities

सिद्धेश्वर यात्रेला 11 जानेवारीपासून सुरुवात, 17 तारखेला होणार समारोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा यंदा ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. अक्षता सोहळा मात्र १३ ऐवजी १४ तारखेला होईल. त्याची तयारी मानकरी मंडळी करत आहेत.
११जानेवारी : योगदंड पूजा
मागील९०० वर्षांपासून यात्रेची परंपरा आहे. श्रीसिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाची पूजा उत्तर कसब्यातील शिवानंद हिरेहब्बू यांच्या घरी यंदा ११ जानेवारीला होत आहे. योगदंड हिरेहब्बू निवासातून शुक्रवार पेठेतील (कै.) रामचंद्रप्पा शेटे यांच्या घरी घेऊन जातात. तेथे याचे विधीवत पूजा होईल.

१२जानेवारी : साज चढवणे
रात्रीसव्वाबाराच्या सुमाराला हिरेहब्बू निवासात पहिले दोन नंदीध्वज घोंगडी, हारडे, पाटल्या इतर अलंकारांनी सजवण्यात येतील. येथे मानकरी हिरेहब्बू देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजाची पूजा करण्यात येईल.
१३जानेवारी : यण्णीमज्जन
सकाळीआठ वाजता उत्तर कसब्यातून पहिले दोन नंदीध्वज निघतील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या प्रवेशव्दाराजवळ सातही नंदीध्वज आल्यावर यात्रेला सुरुवात होईल. तेथे सरकारी आहेर देत सिद्धरामेश्वर मंदिरातील पहिल्या श्री अमृत लिंगास तैलाभिषेकाने नंतर शहरातील ६८ लिंगांना तैलाभिषेक होईल.
१५जानेवारी : करमुटगी
सकाळीवाजता सातही नंदीध्वजांना करमुटगी नामक आयुर्वेदिक जडीबुडीच्या लेपनाने सिद्धरामेश्वर तलावात स्नान घालण्यात येईल. तेथून पुनश्च नंदीध्वज तयार होऊन रवाना होतील. सायंकाळी पाच वाजता जुनी फौजदार चावडीजवळ येत पहिल्या नंदीध्वजाला नागफणी बांधण्यात येईल. तेथून सायंकाळी होम मैदानावर होम मध्यरात्री एकला वासराची भाकणूक होईल.
१६जानेवारी : दारूकाम
प्रतिवर्षी१५ जानेवारीला होणारा शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रम यंदा १६ जानेवारीला होत आहे. सायंकाळी पाच वाजता नंदीध्वज उत्तर कसबा येथून निघून मध्यरात्री दोन वाजता पुन्हा हिरेहब्बू वाड्यात परततील.
१७जानेवारी : कप्पडकळी
दुपारी१२ च्या सुमारास योगदंड शुक्रवार पेठ देशमुख वाड्यात नेला जातो. तेथे नंदीध्वजावरील खोबरे, खारीक लिंबाच्या हाराचा साज काढला जाईल. रात्री दहाला पहिले पाच नंदीध्वज बाळीवेस मल्लिकार्जुन मंदिरात येतील. मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून यात्रेची सांगता होईल.
करमुटगी म्हणजे काय?
नंदीध्वजांनानागरमोथा, कचोला, रिठा, शिककाई, हळकुंडाची हळद, बावची, चंदन, हिरडा, बेहडा आदी प्रकारच्या वनऔषधींचे एकत्रित मिश्रण केले जाते. हे मिश्रण दूध किंवा पाण्यात कालवून त्याचा लेप नंदीध्वज आणि मानकरी हिरेहब्बू यांच्या शरीराला चोळण्यात येऊन थकवा दूर करण्याचा हा विधी असतो.
१४ जानेवारीला अक्षता सोहळा
सकाळीसात वाजता हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वजांची पूजा होऊन योगदंडाच्या साक्षीने सुगडी पूजा होईल. तेथून अमृतलिंगाला पंचामृत अभिषेक घालून दुपारी अक्षता सोहळा होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सातपर्यंत नंदीध्वज शहरातील ६८ लिंगांना प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा हिरेहब्बू वाड्यात पोहोचतील.