आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Orgnise Natyasammelan At Belgaum, Ministers Demanded To Natyaparishad

सीमालढ्यासाठी बेळगावी नाट्यसंमेलन घ्या!, मंत्र्यांची नाट्यपरिषदेकडे साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - सीमावर्ती भागातील मराठी माणसाला बळ देण्यासाठी अशी संमेलने राज्याबाहेरही व्हावीत, अशी अपेक्षा राज्याचे विधी व न्यायमंत्री उदय सामंत यांनी येथे व्यक्त केली. पुढचे नाट्यसंमेलन बेळगावात घ्यावे, अशी सूचना त्यांनी नाट्य परिषदेला केली. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री दिलीप सोपल, माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी या सूचनेचे स्वागत केले.
* बाराशे, पंधराशे वर्षे जुन्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. त्याहून जुन्या मराठी भाषेला हा दर्जा का मिळत नाही? - राज्यमंत्री उदय सामंत यांचा सवाल.
* मराठीने साहित्य व नाट्य -कला समृद्ध केली आहे. हा झेंडा सर्वदूर पोचण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची महाराष्‍ट्र शासनाची तयारी - जलसंपदामंत्री
सुनील तटकरेंची ग्वाही.
* बेळगावात जेव्हा संमेलन घेऊ तेव्हा भुजबळांना तिथे पहिल्यांदा पाठवू. कारण कन्नडिगा काय आहेत, हे भुजबळांना माहीत आहे. - दिलीप सोपल.
* सासवडच्या साहित्य संमेलनाप्रमाणेच नाट्यसंमेलनातही राजकीय नेत्यांचा वावर. उद्घाटन सत्रात काँग्रेस नेते तर समारोपात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यासपीठावर.
* संमेलनाचे ढिसाळ नियोजन, तरीही रसिकांचा प्रतिसाद.
* नाटकांच्या बसला टोल नको.