आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनकामाच्या सहा हजार फाइल जाळून नष्ट, विविध खात्यांत गेल्या ४० वर्षांपासून साचला होता ढीग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालयाने बिनकामाच्या (मुदतबाह्य) हजार ४२३ फाइल जाळून नष्ट केल्या, तर सुमारे ३२ हजार फाइल जतन करून ठेवण्यासाठी अभिलेख कार्यालयाकडे सोपवल्या.

नष्ट केलेल्यांत १९७६ पासूनची कागपत्रे होती. विविध खात्यांकडे ४० वर्षांपासून बिनकामाच्या फाइल पडून होत्या. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी फाइलसाठी वर्गवारी मोहीम राबवली. त्या तपासणीत ३२ हजार २७६ फाइल महत्त्वाच्या आढळल्या. त्या अभिलेख कार्यालयाच्या हवाली करण्यात आल्या.

जुने संदर्भ, जुने सरकारी निर्णय याची वर्गवारी करून ठेवण्यासाठी निकष आहेत. त्यानुसार प्रत्येक खात्याच्या कार्यालयातील कागदपत्रांची व्यवस्था लागणे अपेक्षित आहे. प्रशासनातील अनेक खात्याच्या कार्यालयात कागदपत्रांचा निपटारा झाला नसल्याने फाइलचे गठ्ठे पडून होते. अनेक वर्षांपासून ही स्थिती होती, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मोहिमेत सरकारच्या निकषाप्रमाणे कागदपत्रे योग्य पद्धतीने ठेवण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखाला कालावधी ठरवून देण्यात आला. बिनकामाची (मुदतबाह्य)कागदपत्रे तत्काळ नष्ट करण्याची सूचना मुंढे यांनी दिली होती.

मार्चअखेरपर्यंत अभिलेख कार्यालयात जमा फाइल
अभिलेखकार्यालयाकडे मार्चअखेर कायम, ३० वर्षे, १० वर्षे वर्षे जतन करण्यासाठी फाइल आलेल्या आहेत. त्या अनुक्रमे अशा, महसूलकडून १४०, २२५, १२१, २८, कुळकायदाकडून ४२७, ०, ३७, ०, अपर जिल्हाधिकारीकडून ०, ६८, ८८, ०, लेखा शाखेकडून ०, २८४, १७६, ०, प्रशासनकडून ०, २८१, १२५, १४१, नगविकासकडून ०, ११, १६, ६१, संगायोकडून २२, ०, ०, ०, सेतूकडून ०, ३२, ०, . एकूण कायम ५८९, तीस वर्षांसाठी ९०१, दहा वर्षांसाठी ५६३ तर पाच वर्षांसाठी एकूण २३० फाइल आलेल्या आहेत.

अशी होती कागदपत्रे
अभिलेखकार्यालयाकडे कायम जतन करण्याच्या हजार १० फाइल आहेत. ही १८७३ ते २०१३ पर्यंतची कागपत्रे आहेत. ३० वर्षे जतन करण्यासाठी : १९७६ ते २०१३ मधील १६ हजार ९८८ फाइल आहेत. १० वर्षे जतन करण्यासाठी : १९९६ ते २०१३ या कालावधीतील हजार ९८८ फाइल आहेत. पाच वर्षे जतन करण्यात येणाऱ्या २००१ ते २००३ कालवधीतील २९० फाइल आहेत. मुदत संपलेल्या फाइल नष्ट केल्या गेल्या नाहीत. १९७६ ते १९८०मधील हजार ८७७, १९९६ ते २००३ मधील हजार २५६ तर २००१ ते २००४ मधील २९० फाइल बिनकामाच्या होत्या. या हजार ४२३ फाइल नष्ट करण्यात आल्या.
फाईल फोटो