आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परगावच्या विद्यार्थ्यांत दमदाटीने वाढला तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातीलकाही अज्ञात तरुणाकडून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये राहणा-या परगावच्या विद्यार्थ्यांना दमदाटी देऊन त्रास दिला जात असल्याचा निषेध करीत विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालयाकडे तक्रार केली. दरम्यान, संशयित तरुणांविरुद्ध जोडभावी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. तसेच, महाविद्यालयाने याची दखल घेत अनधिकृत विद्यार्थ्यांना प्रवेश बंद, ओळखपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी एकी साधावी, मदतीसाठीही एकमेकांकडे मोबाइल नंबर्स द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

परगावच्याविद्यार्थ्यांना नेहमीच त्रास
वालचंदमध्येपरगावहून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परगावचे विद्यार्थी वसतिगृह खासगी सोसायटीत राहतात. काही अज्ञात तरुणांकडून अशा विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाते. एकट्याला गाठून दमदाटी, पैशाची मागणी करणे, असे प्रकार वारंवार घडतात. असाच प्रकार शनिवारीही घडला. यापूर्वीही अज्ञात तरुणाने चार-पाच मुलांनाही त्रास दिल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

शोध सुरू
वालचंदकॉलेजमधील विद्यार्थ्याची तक्रार प्राप्त झाली आहे, संशयितांची नावेही निष्पन्न झाली आहेत. याप्रकरणी त्यांचा शोध सुरू आहे. चौकशीअंती निश्चित उलगडा होईल. एफ.के. काझी, पोलिसनिरीक्षक

मार्ग काढणार
झालेला प्रकार योग्य नाही. सोमवारी पुन्हा विद्यार्थ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, त्यावर निश्चित मार्ग काढता येईल.” डॉ.शशिकांत हलकुडे, प्राचार्य

विद्यार्थ्यांमध्ये आता एकी
वसतिगृहातराहणा-या सिनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विश्वास द्यावा. विद्यार्थ्यांमधील एकी वाढावी, विद्यार्थ्यांचे मोबाइल नंबर एकमेकांना मदतीसाठी द्यावेत, असा तोडगा काढला. बाहेरच्या विद्यार्थ्यांचा त्रास होत असेल तर सिनिअरबरोबर तसेच रेक्टर प्राचार्यांबरोबर वेळोवेळी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.

फिरवले की अपहरण?
थोड्याशाजुजबी ओळखीने या मुलाला हेरण्यात आले. वसतिगृहात जाऊन रूममध्ये त्याची चौकशी केली. तेथून गाडीवर जबरदस्तीने बसवून इकडे- तिकडे फिरवण्यात आले. शेवटी रात्री स्टेशनवर नेऊन सोडले. या प्रकाराने घाबरलेल्या मुलाने मी स्टेशनवर आहे, असे मित्रांना सांगितले. तो रात्री परत वसतिगृहात आला. आता हा अपहरणाचा प्रयत्न होता काय ? याचा तपास पोलिस करतील. दरम्यान, मला मारले नाही, काही नाही, फक्त चहा प्यायला जबरदस्तीने नेले, असे तो विद्यार्थी म्हणतो.

मदत देणार
वालचंदमधील नव्हे तर इतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गावगुंडांचा नाहक त्रास होत असेल तर संघटना निश्चितच या मुलांसाठी विश्वासाचा हात देईल. लहूगायकवाड, अध्यक्ष,विद्यार्थी सेना
वालचंद अभियांत्रिकीच्या वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्रवेशद्वारावर जमून विद्यार्थ्यांमध्ये एकीची भावना असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांच्याशी संपर्क साधून समस्या मांडल्या.
बातम्या आणखी आहेत...