आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पुलं’च्या आठवणींनी रसिक तृप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शब्द, भाषा, सुसंस्कार यांचा उहापोह करता वागण्याचा सुसंस्कृतपणाचा गंध नसणारे रावसाहेब आणि शब्दांचा वेध घेणारे भाषाविषयक धोरणच्या अभिवाचनाने रसिकांच्या मनाला मोहिनी घातली. विविध किस्से आणि प्रसंग अनेक संस्मरणीय आठवणींना उजाळा देणाऱ्या क्षणांनी सभागृहातील रसिक सुखावले होते. निमित्त होते प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनी केलेल्या अभिवाचनाचे.
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये जवळीक नाट्य संस्थानिर्मित, शशिकांत लावणीस दिग्दर्शित आमचे भाषा विषयक धोरण’ या प्रहसन ‘रावसाहेब’ या कलाकृतीने खुसखुशीत साहित्य षटकारांच्या पुन्हा आठवणी जाग्या केल्या. रावसाहेब हे बेळगावी व्यक्तिमत्त्व सांगताना लावणीस यांनी रसिकांची मने जिंकत काही काळ संपूर्ण सभागृह पुलमय केले होते.

रावसाहेबांचे वागणे त्यांच्या शिव्या देण्याची पद्धत यामुळे प्रेक्षकांच्या समोर चक्क रावसाहेब उभे राहिले होते. पुलंच्या प्रतिमेचे प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी मंचावर मोहन सोहनी, श्रीनिवास येमुल, आनंद कुंभार आणि वनिता म्हैस्कर हे उपस्थित होते.
कट्ट्याने काळ गाठला
लावणीसयांनी अभिवाचन करताना काळाचे लूक यावे यासाठी जुन्या एका गॅलरीचे कठडे आणि टेबल पुलंच्या जुन्या दुर्मिळ चित्रफिती यांचे सादरीकरण रसिकांना त्या काळात घेऊन जाणारे होते.
‘रावसाहेब’वेळी मन हळवे झाले
रावसाहेब हे कसे होते हे सांगताना ‘पुलं’नी आपल्या लिखाणात असे लिखित केले की, ते संवेदनशील होते. एखाद्या लहान मुलांप्रमाणे होते. त्यांच्या शिव्या म्हणजे वरवर केलेला राग, मात्र आतून प्रेम असे. तसा प्रसंग वाचताना रावसाहेबांच्या कचेरीत काम करणाऱ्या एका कारकुनाने त्यांचे पैसै चोरल्यावर ‘जा रे शिंच्या बायकोला दवाखान्यात ने’ असे सांगणारे त्यांचे शब्द त्यांच्या दयाळू मनाची व्याप्ती सांगणारे आहेत. ते लावणीस यांनी उत्तमपणे सादर केले. चित्रपटाची कथा लिहिताना त्यांनी कथेवर केलेल्या सूचना त्यांचा मधेमधे करण्याचा स्वभाव हे भाव खळखळून हसवणारे होते.
बातम्या आणखी आहेत...