आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीसाठी जात, गरिबीची लढाई हवी, पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्यनगरीतून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकशाही आणि आर्थिक विषमता एकत्र नांदू शकणार नाही. खरी लोकशाही टिकवण्यासाठी जात आणि गरिबीची लढाई लढावीच लागेल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक प्रा. तानाजी ठोंबरे यांनी शनिवारी मांडले. सांस्कृतिक आक्रमण ही जात आणि वर्गलढा बोथट करणारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
अजिंक्य कल्चरल अकॅडमीच्या वतीने अायोजित केलेल्या १३ व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनातील परिसंवादात ते बोलत होते. ‘भारतीय लोकशाहीची क्रांती जातीअंताशिवाय शक्य नाही’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. प्रमोद लांडगे होते. प्रा. ठोंबरे म्हणाले, “उदारमतवादातून नवउदारमतवादाकडे जाणारा मार्ग सर्वसामान्यांना वैचारिक गाेंधळात टाकणारा आहे. एक माणूस, एक मत आणि एक मूल्य ही घोषणा समानतेची आहे. परंतु आर्थिक समानतेची घोषणा कुठे आहे? व्यवसाय बंदीतून जाती िनर्माण झाल्या. त्यातूनच शिक्षणबंदी झाली, उद्योगबंदीमुळे संपत्तीबंदी आली. याबाबत कुणी बोलतच नाही. भाकरीचा लढा, झोपडीचा लढा दिसून येत नाही.''
महासत्ता कसा होईल?
रोजच्याआत्महत्या, घाणीतील राहणीमान, कचरा उचलणारी तळागाळातील माणसं, हे वास्तव स्वीकारून महासत्तेच्या गप्पा कशा करू शकतो. उदार लोकशाहीने संपत्तीचा अधिकारच नाकारला. त्यांच्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या गेल्या, त्यातील आत्माच काढून घेण्यात आला. ही सारी स्थिती आत्मशोध घ्यायला लावणारी असल्याचेही श्री. ठोंबरे म्हणाले.