आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पद्मशाली’चे संकेतस्थळ राज्यपालांच्या हस्ते सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शिक्षिततरुणांची उन्नती आणि कामगारांना रोजगाराच्या वाटा दाखवण्यासाठी येथील पद्मशाली फाउंडेशनने संकेतस्थळ सुरू केले. त्याचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. मुंबईच्या राजभवनात झालेल्या या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती होती.
मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या रामदास सब्बन यांनी हे संकेतस्थळ विकसित केले. समाजातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत यायला पाहिजेत. विडी कामगारांना पर्यायी रोजगार कोणते आहेत. बंद गिरणी कामगारांसाठी कुठला रोजगार आहे, आदींची माहिती या संकेतस्थळावर आहे. विशेष मागास प्रवर्ग आणि मागासवर्गासाठी कोणत्या संधी आहेत. महिला, बालकल्याण, अपंग आदींसाठी कुठल्या कल्याणकारी योजना आहेत, आदींची माहितीही या संकेतस्थळातून मिळते, अशी माहिती फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल यांनी दिली.
सोलापूर, पुणे, नगर, मुंबई, नागपूर, नांदेड आदी ठिकाणी राहणाऱ्या पद्मशाली समाजबांधवांची तपशीलवार माहितीही या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. शैक्षणिक आणि इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी याचा उपयोग होऊ शकतो. उद््घाटन कार्यक्रमासाठी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, विश्वस्त दिनेश यन्नम आदी उपस्थित होते.पद्मशाली फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करताना राज्यपाल विद्यासागर राव. शेजारी अॅड. रामदास सब्बन, जगनबाबू गंजी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, दिनेश यन्नम आदी.
उद्योग मार्गदर्शन
कामगारांच्या मुलांसाठी खास करून उद्योगासंबंधी मार्गदर्शन करणारी माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. यंत्रमाग कामगारांना तसेच त्यांच्या मुलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी अल्प व्याजदरात कर्जे मिळतात. त्याची माहिती कामगारांपर्यंत पोचलेली नाही. किमान कौशल्ये आत्मसात करणाऱ्यांना अनेक उद्योग करण्याच्या संधी आहेत. इच्छाशक्ती असणाऱ्यांनी या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सब्बन यांनी केले आहे.