आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Padmasing Patil Jeep Accident In Barshi News In Marathi

पद्मसिंह पाटील यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत चिमुरडीचा मृत्यू; जमावाने वाहन पेटवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - राष्ट्रवादीचे उस्मानाबादेतील उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचाराच्या ताफ्यातील जीपने मंगळवारी दुचाकीला ठोकरल्याने शिवानी दादासाहेब भोसले (6, कुंभेज, ता. करमाळा) ही चिमुरडी ठार झाली. तिचे मामा युवराज काळे (25, पानगाव, ता. बार्शी) जखमी झाले.
पानगाव येथील चौकात हा अपघात झाला. वैराग पोलिसांनी वाहनासह चालक भीमराव उत्तम जगताप (31, नान्नज, ता. जामखेड, जि. नगर) याला अटक केली आहे.
पानगावातील प्रचार उरकून जीप कोरफळेच्या दिशेने निघाली होती. युवराज दुचाकीवर शिवानी व सायली भोसले (वय 3 वर्षे) या भाच्यांना घेऊन जात होता. क्रॉसिंगवर जीपने दुचाकीला ठोकरले. यात युवराज व सायली एका बाजूला पडले, तर शिवानीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
जमावाने वाहन पेटवले
अपघातानंतर संतप्त तरुणांनी जीपची तोडफोड केली. प्रचाराचे साहित्य पेटवले. त्यानंतर वैराग पोलिसांनी जीपचालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. जीपमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्याचीही चर्चा आहे. मात्र, पोलिस दप्तरी त्याची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेने पानगावात शोककळा पसरली.