आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थांमध्ये वाद : ज्ञाती संस्थेचा बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - समाजातील ज्येष्ठांना, ज्ञातीच्या पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता पद्मशाली शिक्षण संस्थेचा सांगता समारंभ रविवारी (ता. 29) होत आहे. त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. समाजबांधवांच्या भावना लक्षात घेता निमंत्रित मंत्र्यांनीही कार्यक्रमास येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

या सांगता सोहळ्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय पर्यटनमंत्री आणि अभिनेता चिरंजीवी येत आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले असताना, ज्ञातीच्या या निर्णयामुळे समाजात मोठे वादंग निर्माण झाले आहे. मार्कंडेय मंदिरात बुधवारी झालेल्या बैठकीची माहिती र्शी. कारमपुरी यांनी पत्रकारांना दिली.

ते म्हणाले, ‘‘समाजातील उच्च शिक्षितांना सभासद होण्यापासून वंचित ठेवून संस्था ताब्यात ठेवण्याचा त्यांचा डाव आहे. त्यासाठी समाजालाच वेठीस धरले. त्यामागे मलिदा खाण्याचा हेतू आहे. बहिष्कार टाकून संबंधित मंत्र्यांचे या कृत्याकडे लक्ष वेधणार आहोत.’’