आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेडन्यूज प्रकरणी प्रमुख उमेदवार अडचणीत, भालके, प्रणिती शिंदेंसह 17 जणांना नोटिसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पेडन्यूज प्रकरणीमतदारसंघांतील 17 उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये विद्यमान आमदार बबनराव शिंदे, भारत भालके, प्रणिती शिंदे यांच्यासह 17 उमेदवारांचा समावेश आहे. बबनराव शिंदे युवराज चुंबळकर यांनी नोटिसीला उत्तर दिले असले तरी ते अमान्य करण्यात आले आहे. इतर उमेदवारांकडून अद्याप खुलासा प्राप्त झाला नाही.
करमाळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रश्मी बागल, ‘स्वाभिमानी’चे उमेदवार संजय शिंदे यांना नोटीस देण्यात आली आहे. माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार बबनराव शिंदे, दादासाहेब साठे, शिवाजी सावंत, कल्याणराव काळे यांना नोटीस देण्यात आली आहे. बार्शी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र मिरगणे, मोहोळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कदम, शहर उत्तरमधील काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ चाकोते, शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे, शिवसेना उमेदवार महेश कोठे यांना पेडन्यूजप्रकरणी नोटीस दिली आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मनसेचे युवराज चंुबळकर, शिवसेनेचे गणेश वानकर तर पंढरपूर मतदारसंघातील विद्यमान आमदार भारत भालके, प्रशांत परिचारक, चंद्रकांत बागल, समाधान आवताडे यांनाही नोटीस देण्यात आली आहे.

बातम्या प्रकरणी आक्षेप...
पेडन्यूजप्रकरणीदिलेल्या नोटिसीमध्ये वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्याप्रकरणी आक्षेप घेऊन या बातम्याविषयी खुलासा करावा, अन्यथा या बातम्या जाहिरात म्हणून याचा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात का येऊ नये? असे नमूद केले आहे. याला आमदार बबनराव शिंदे युवराज चुंबळकर यांनी उत्तर दिले अाहे. खुलाशामध्ये निवडणूक म्हणणे अमान्य करीत पेडन्यूज दिली नसल्याचे म्हटले आहे.