आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी शहरात येणार 101 पालख्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे अवतारकार्य 101 वर्षांचे होते. त्याचे प्रतीक म्हणून यंदाच्या पालखी महोत्सवात 101 पालख्या सहभागी होतील, असा संकल्प करण्यात आल्याची माहिती बृहन्मठ होटगी अधिपती तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. हब्बू पुजारी परिवार आणि बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने शिवयोगी सिद्धरामेश्वर पालखी सोहळा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

सर्व पालख्या 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी मंदिर येथे एकत्र येणार आहेत. रात्री कीर्तन, प्रवचन, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहा वाजता मंदिरातील पंच परमेश्वर लिंगाची आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पूजा होईल. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महापालिका सभागृह नेते महेश कोठे यांच्या उपस्थितीत महाआरती आणि पालखी पूजा होऊन पालख्या प्रस्थान करतील. दुपारी एक वाजता सिद्धेश्वर मंदिरात पालखीचे आगमन होईल. योग समाधी येथे पोलिस आयुक्त प्रदीप रासकर हे स्वागत करतील. यावेळी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, कर्नाटक स्टेट फॉरेस्ट इंडस्ट्रीज कार्पोरेशनचे अध्यक्ष शंकर गौडा पाटील, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत योग समाधीस महाआरती होईल. महाप्रसादानंतर पालख्या पूर्व ठिकाणी परततील.

पत्रकार परिषदेस एस. डी. स्वामी, एस. एम. धनशेट्टी, आनंद हब्बू, प्रशांत हब्बू, सुभाष हब्बू, सुरेश हब्बू, लक्ष्मण तेलंगी, राजशेखर व्हनमाने, राजेश हब्बू आदी उपस्थित होते.