आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढा पंचायत समितीमध्ये स्वच्छता मोहीम, सभापती रजपूत यांच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी- स्वच्छभारत मिशन या कार्यक्रमाअंतर्गत परिसर स्वच्छतेसाठी माढा पंचायत समितीच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ सभापती शीला रजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षण विभागाचे कार्यालय, परिसर झाडून स्वच्छ करण्यात आले. या अभियानासाठी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब वाघमोडे, भीमराव वजाळे, भारत शिंदे, भारत कापरे, विद्या पाटील, सुंदर माळी, गटविकास अधिकारी सोमनाथ वैद्य, युवराज म्हेत्रे, सयाजी बागल, व्ही. एच. जगतापे, सचिन रणदिवे, उमेश येळवणे, प्रशांत फडतरे उपस्थित होते. सर्व घटकांचा सहभाग, श्रमदानाची सवय, स्वच्छतेचे महत्त्व यासाठी पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत स्तरावर सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून आठवड्यातून दोन तास श्रमदान करण्यात येणार आहे. माढा पंचायत समितीच्या सभापती शीला रजपूत यांनी स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला.