आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विठोबाचरणी सौदी, थायलंडहून देणगी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पंढरपूरच्या पांडुरंगाला आषाढीच्या दहा दिवसांत 2 कोटी 35 लाख 58 हजार 368 रुपयांची देगणी प्राप्त झाली आहे. सौदी अरेबिया, ओमान, नेपाळ आणि थायलंड आदी देशांच्या चलनी नोटा दानपेटीत आढळून आल्या आहेत. एका दिवसात एक लाख प्रसादाच्या लाडूंच्या विक्रीचाही नवा विक्रम यंदा मंदिर समितीने केल्याची माहिती प्रांत अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली. विठ्ठल नामाचा गजर करीत सुमारे दहा लाखांच्या आसपास वारकरी आषाढी यात्रेत पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. पांडुरंगाच्या पंढरीची कीर्ती आता आखाती देशांतही पसरत आहे.
आषाढीच्या दहा दिवसांत एक कोटी 47 लाख 96 हजार 523 रुपयांची देणगी पावती, देणगी व लाडू विक्रीतून मिळाली आहे. दान पेटीतून 87 लाख 61 हजार 844 रुपयांची देणगी मिळाली आहे.
बँक ऑफ ओमानच्या शंभर बैसा, युनायटेड अरब अमिरातच्या दहा दिरामच्या दोन, तर पाच दिरामची एक नोट, सौदी अरेबियाचे पाच रियाल, नेपाळचे दहा रुपये, थायलंडच्या शंभर डॉलर आणि वीस डॉलरच्या नोटा दानपेटीत आढळल्या आहेत.
1 लाख लाडू प्रसाद विक्रीचा उच्चांक - एका दिवसात प्रसादाच्या एक लाख लाडू विक्रीचा नवा उच्चांक यंदा झाला आहे. यापूर्वी एका दिवसात 60 हजार लाडू विक्रीचा उच्चांक होता. पंढरीच्या पांडुरंगाची वेबसाइट सुरू करून अवघ्या आठ महिन्यांचा कालावधी झाला आहे. देश, परदेशांतून देणग्या मिळण्यास आता प्रारंभ झाला असल्याचे पंढरपूरचे प्रांताधिकारी व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी सांगितले.