आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विठ्ठलाला रेशमी वस्त्र नको; धोतर, घोंगडीच नेसवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - पंढरपूरचा श्री पांडुरंग हा सर्वसामान्य व कष्टकर्‍यांचा देव आहे. त्यामुळे येथील मूर्तीस रेशमी वस्त्र नेसवू नये. त्याऐवजी धोतर, घोंगडी आणि काठी हाच श्री विठ्ठलाचा पोशाख असायला हवा. तसेच पूजेच्या वेळी पुरुषसूक्त म्हणण्याची प्रथाही रद्द करून ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान व संत तुकारामांचे मंगलाचरण म्हणावे, अशी मागणी र्शमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

सर्वोच्च न्यायालयाचा श्री विठ्ठल मंदिराविषयीचा निकाल स्वागतार्ह आहे. आता र्शमिक मुक्ती दलाने श्री विठ्ठल मंदिराविषयीचा दुसरा लढा हाती घेतला आहे, असे सांगून पाटणकर म्हणाले, विठ्ठल मंदिर अधिनियमातील विठ्ठलाच्या पूजेवेळी पुरुषसूक्त म्हणण्याची आणि मूर्तीला रेशमी वस्त्र परिधान करण्याची अट रद्द करण्यासाठी हा लढा असेल. मंदिर कायद्यात विनाकारण पुरुषसूक्त पठण व रेशीमवस्त्राची अट घुसडण्यात आली. विठ्ठल हा समानतेचा संदेश देणारा देव आहे. परंतु या अटींमुळे विषमता प्रस्थापित होत असल्याने त्यास विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुक्ती दलाचे जिल्हाप्रमुख मोहन अनपट व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
शासकीय पूजाही बंद करा : आषाढी यात्रेला मुख्यमंत्री व कार्तिकी यात्रेला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार्‍या शासकीय पूजाही बंद करण्याची आमची मागणी आहे. यासाठी शासनाला वर्षभर मुदत देऊ. या काळात शासनाने निर्णय न घेतल्यास येत्या वर्षअखेर आम्ही जनहित याचिका दाखल करू, असेही पाटणकर यांनी सांगितले.

..अन्यथा मुख्यमंत्र्यांना पूजाच करू देणार नाही
मध्यंतरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आषाढी एकादशीपर्यंत कायद्यातील दोन्ही अटी रद्द करण्यासंबंधी पत्र द्यावे. तसे न झाल्यास मुख्यमंत्र्यांना पूजा करण्यापासून रोखू, असा इशारा पाटणकर यांनी दिला.

.. मंत्रपठण, वस्त्रांमुळे विषमतेला पाठबळ
श्री विठ्ठल मंदिर कायद्यात विनाकारण पुरुषसूक्त पठण व रेशीमवस्त्राची अट घुसडण्यात आली. विठ्ठल हा समानतेचा संदेश देणारा देव आहे. परंतु या अटींमुळे विषमता प्रस्थापित होत असल्याने त्यास विरोध आहे, असे पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)