आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरच्या विठोबाला उन्हाळ्याची उटीपूजा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - महागाईच्या झळा सर्वसामान्यांप्रमाणे आता श्री विठ्ठलभक्तांना बसू लागल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये श्री विठुरायाची दररोज दुपारी जी उटीपूजा केली जाते त्या पूजेच्या शुल्कामध्ये या वर्षी मंदिर समितीने दुपटीने वाढ केलेली आहे. सध्या श्री विठुरायाच्या पूजेसाठी दहा हजार, तर श्री रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 5 हजार रुपये शुल्क आकारण्यात आलेले आहे. चंदनाच्या किमतीमध्ये झालेल्या भाववाढीमुळे पूजेच्या शुल्कात वाढ करण्यात आल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगितले जात आहे. चैत्र पाडव्यापासून श्री विठ्ठलाच्या चंदन उटीपूजेस प्रारंभ होतो. उन्हाळ्यातील वाढत्या उन्हापासून श्री विठ्ठलाला त्रास होऊ नये या भावनेतून ही उटीपूजा केली जाते. या पूजेच्या वेळी श्री विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावण्यात येत असतो, हे या पूजेचे खास वैशिष्ट्य आहे.

पूजेसाठी लागणार पाच ते दहा हजार रुपये
चैत्र पाडव्यापासून ते मृग निघेपर्यंत दररोज तीन भाविकांना ही पूजा करता येते. त्यासाठी अर्धा ते पाऊण किलो चंदन लागते. यंदा श्री विठ्ठलाच्या पूजेसाठी 10 हजार, रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी पाच हजार रुपये इतके शुल्क आकारण्यात आलेले आहे. पूजेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेले आहेत. सध्या एप्रिल महिन्यातील यादी प्रसिद्ध आली आहे.