आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्री विठ्ठलाचे 24 तास दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी येणार्‍या प्रत्येक भाविकाला दर्शन घडावे यासाठी रविवारपासून श्री विठ्ठलाचे सर्व नित्योपचार पंधरा दिवसांसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे आता 24 तास दर्शन सुरू राहील. नऊ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांना सोलापूर जिल्ह्यात प्रवेशाचे वेध लागले आहेत. यात्रेतील गर्दीमुळे श्री विठुरायाचे मनाजोगे दर्शन घडत नसल्याने पालखी सोहळ्यातील भाविक आधी येथे येऊन पुन्हा दिंड्यांमध्ये सहभागी होतात. हे नित्योपचार 15 जुलैपर्यंत बंद राहणार असून 16 जुलैला प्रक्षाळपूजेनंतर पुन्हा सुरू होतील.