आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्याने नव्हे, संत शिकवणीतूनच निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात बहुजन आणि महिला पुजारी नेमण्याच्या ऐतिहासिक निर्णयामागे मंदिर कायदा अथवा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नसून पंढरीच्या वारीतून मिळणारी संतांची शिकवणच आहे. या शिकवणीमुळेच सर्वसामान्य नागरिक परिवर्तनाच्या विरोधात नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने 15 जानेवारी 2014 रोजी दिलेल्या आदेशानंतर बहुजन समाजातील पुरुष आणि स्त्रियांना मंदिरात पुजारी म्हणून नियुक्तीचा निर्णय झाला. त्यामुळे या निर्णयामागे न्यायालय आणि मंदिर कायदा आहे, असा समज तयार झाला आहे. मात्र, कोणत्याही न्यायालयाने अथवा मंदिर कायद्यानेही बहुजन समाजातील पुरुष आणि महिलांना पुजारी नेमण्याची तरतूद अथवा सक्ती केलेली नाही. हा निर्णय अनेक पिढ्यांची वारीची परंपरा लाभलेल्या मंदिर समितीच्या सदस्यांनी आणि विशेषत: अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सामाजिक समतेच्या हेतूने घेतला आहे.या परिवर्तनाचं पहिलं पाऊल पडलं होतं ते 1968 मध्ये. शोषक व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी त्या वर्षी शासनाने बी.डी. नाडकर्णी या निवृत्त न्यायाधीशांचा एक सदस्य आयोग नेमला. या आयोगाने पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी कायदा करण्याची शिफारस केली. त्यानुसार 1973 साली ‘पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान कायदा ’ अस्तित्वात आला. त्यातील तरतुदींना मंदिरातील बडवे आणि उत्पात यानी वारंवार आव्हान दिले. सोलापुरातील दिवाणी न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई तब्बल 40 वर्षे सुरू होती. 15 जानेवारी 2014 ला तिचा शेवट झाला. मात्र, न्यायालयाने केवळ
काय म्हणतो मंदिर कायदा
पूजा पारंपरिक व वैदिक पद्धतीने आणि देवस्थानाच्या वैभवाला साजेल अशी व्हावी. पुजारी हे हिंदू व विठ्ठलभक्त असावेत. त्यांना वैदिक पद्धतीने पूजा करता यावी.

काय म्हणते सर्वोच्च् न्यायालय
मंदिर कायद्याने विशिष्ट कुटुंब किंवा बडवे व उत्पात यांना पूजेचा एकाधिकार नाही. त्यामुळे त्यांचा एकाधिकार मान्य नाही. त्यामुळे अधिकारासाठी याचिका फेटाळण्यात येते.

देवाने आणि संतांनीही भेद पाळला नाही
विठ्ठलाचे भक्त असलेले सर्वच संत जातिभेद न मानणारे होते, मग आपण कशाला जातिभेद करायचा, हा विचार मंदिर समितीचा होता. महिलांना पूजेचा हक्क नाही, असे मनूने म्हटले आहे. पण विठ्ठलाने संत जनाबाईबरोबर दळण दळले. संत सखुबाईच्या झोपडीत पाणी भरले. असा हा पांडुरंग महिलांना बाजूला ठेवताना दिसत नाही. तर मग आम्ही तरी का ठेवायचे? असा विचार महिला पुजारी नेमताना मंदिर समितीने केला.’’
अण्णा डांगे, अध्यक्ष, मंदिर समिती, पंढरपूर