आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानगल हायस्कूलमध्ये दहशत पसरवली; सात जणांवर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सिद्धेश्वर पेठेतील पानगल हायस्कूलमध्ये तलवार, चाकू, काठय़ांचा धाक दाखवत गोंधळ घातल्याप्रकरणी सातजणांविरुद्ध जेल रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जैद नईम शेख (रा. शारदा हाउसिंग सोसायटी, जुळे सोलापूर) यांनी मंगळवारी फिर्याद दिली आहे.

नझीर अ. अजीज शेख, इमाद शेख, रवींद्र साळवी, उमर बाँबेवाला, मुबीन बशीर सय्यद, इब्राहिम शेख, रईस शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 8 जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमाराला जैद शेख हे शाळेत थांबले होते. त्यावेळी वरील सातजणांनी पानगल व बेगम कमरूनिसा हायस्कूलचे दोन्ही गेट बंद केले. घातक हत्यारासह संस्थेच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. वॉचमनला मारहाण केली. कार्यालयातील कपाटे, टेबल, खुच्र्या यांची मोडतोड केली. याला जैद शेख यांनी विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचीम तपास करीत आहेत.