आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अखेर झाली सुटका, तीन दिवसांनी गोल्डन क्वीनला सुुखरूप खाली आणले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नई जिंदगी भागातील सहारा मल्टिपर्पज हॉल परिसरातील अब्दुलरजाक शेख यांनी मांजर पाळले आहे. गोल्डन क्वीन असे त्या मांजराचे नाव आहे. शनिवारी एका कुत्र्याने त्या मांजराचा पाठलाग केला. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ते मांजर ३५ ते ४० फूट उंच नारळच्या झाडावर चढले. जीव वाचला,पण मांजर झाडावर अडकले.
कुत्र्याला घाबरून मांजर चढले झाडावर
सोमवारी सकाळी अग्निशामक दलाचे पथक आले. त्यातील बाबूलाल नदाफ हे झाडावर चढले. त्यांनी त्या मांजराला पोत्यात टाकले आणि सावकाश खाली आणले. खाली आणल्यानंतर पोते खोलताच मांजर उडी मारून शेख यांच्या कुशीत जाऊन बसले. आणि तीन दिवसांच्या धावपळीनंतर सर्वांनी निश्वास टाकला.

दोन दिवस मांजर घरी आल्याने शेख यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा मांजर नारळाच्या झाडावर अडकून पडल्याचे दिसले. त्यानंतर मांजराला खाली उतरवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले.पण यश आले नाही.अखेर नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे सदस्य पप्पू जमादार यांना बोलवण्यात आले. त्यांनीमनपा अग्निशामक दलाला बोलाविले.