आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकत्व म्हणजे आनंददायी सकारात्मक वर्तन होय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मला वाटलंच होतं.. तू असेच वागणार, असेच पडणार, नापासच होणार, तुला काही येतच नाही, तुझ्यापेक्षा तो शेजारचा अमित पहा, असे नकारात्मकरीत्या म्हणत.. म्हणतच आपण तणावलेल्या चेहऱ्यांंनी आपल्या मुलांना वाढवित असतो. खरे तर रागावून, मारून, अपमानित करून, हेटाळणी करून, तुलना करून मुलांना मोठे करणे म्हणजे नकारात्मक जडणघडण करणेच असते. ते मूल मनातून खचत जाते. पराभूत मनोवृत्तीचे बनते, पालकांनो, आनंददायी पालकत्व निभावा, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तथा समुपदेशक रेणू गावसकर यांनी व्यक्त केले.


दिशा अभ्यास मंडळाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या "बालभवन' संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त रविवारी किर्लोस्कर सभागृहात व्याख्यान झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. "पालकत्व' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी अॅड. नीला मोरे, अरुणा बुरटे, दत्ताजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. गावसकर यांनी सहज ओघवत्या शैलीत पालकांशी मुक्त संवाद साधला.


गावसकर म्हणाल्या, 'घरात नेहमीच अापले चेहरे चौकोनी, मुले कशी हसतील? आपण त्याला असे करू नको, तसे करू नको असे उपदेश देत गप्प बसवितो. सतत सूचना देत, मला वाटलंच होतं.. असे म्हणणे हे सर्वात भयकारी वाक्य. संपूर्ण निराशा. याचा अर्थ मुलांना काहीच येत नाही, अशी मानसिकता बनविते. नेहमी निगेटिव्ह बोलणे, अपमानित करणे टाळा. पदोपदी हेटाळणी केल्यास मुलांची मानसिक वाढ कशी होईल. हसतमुख चेहरा ठेवणे हे सर्वात देखणे. मग चेहऱ्याचा रंग कसाही असाे, त्याचा फरक पडत नाही. संपूर्ण भारतात, दूध जैसा गोरा असा कोणीच नाही. त्यामुळे चेहऱ्यांचा रंग बदलणे हा उपचार नाही तर चेहरा हसतमुख ठेवणे शिका.'


कित्ती झक्कास चहा बनवलास गं..
मुलांसमोरजे वर्तन करता तेच मूल उचलते. त्यामुळे त्याच्या समोर आई वडिलांचे वर्तन सकारात्मक असले पाहिजे. म्हणजे कामावरून दमून आलेल्या बाबांना आईने हसतमुखाने चहा दिला आणि तितक्याच सहजतेने बाबांनी.. काय गं.. कित्ती झक्कास चहा बनवलास तू. खरंच असे म्हणणे हे मुलांसाठीही खूप परिणामकारक ठरते. ती माऊलीही सुखावते, मूलही सुखावते. संवाद उत्साही आनंदी होतो. पर्यायाने मुलेही उत्साही बनतात. हेच उलटही करता येईल.


फोटोः व्याख्यान देताना रेणू गावस्कर. त्यावेळी दत्ता गायकवाड, नीला मोरे आदी.