आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगची जागा आठ दिवसांत खाली करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पार्किंगसाठी देण्यात आलेल्या जागेचा वापर व्यवसायासह इतर कारणांसाठी होत असल्याच्या कारणांवरून 46 जणांना महापालिकेने नोटिसा काढल्या आहेत. आठ दिवसांत पार्किं गची जागा मोकळी करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. नगरसेवक मनोहर सपाटे, मनसेचे शहराध्यक्ष तथा उद्योजक युवराज चुंबळकर तसेच नगरसेवक चेतन नरोटे यांच्या नातेवाइकांसह वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांचा समावेश आहे.

गुरुवारी पार्किंग जागेचा वापर इतर कारणांसाठी करणार्‍यांची पहिली यादी(2009 पूर्वी परवाना घेणारे) जाहीर केली आहे. मनपाने 46 जणांना नोटीस काढल्या असल्या तरी अनेकांना मिळालेल्या नाहीत. मुदतीनंतर पाडकाम करण्याचे नोटिसीत म्हटले आहे.

पार्किंग जागेच्या गैरवापराचा यांच्यावर ठपका
प्रमोद मिरजकर, कृष्णातसा मेंगजी, प्रभाकर झाड, हणमंतसा बंकापुरे, दैवज्ञ समाजचे अरविंद रेवणकर, रेवणसिध्देश्वर समाजसेवा मंडळ, गोरखनाथ नरोटे, राजेंद्र औसारे, कु. मु. रवींद्र गुजराथी, विजयालक्ष्मी कनाळे, कौसर शेख, अशोक बुरंजे, जावीद काडगावकर, अरविंद धुम्मा, र्शीहरी भंडारीचे कु. मु. र्शीनिवास आरकाल, जामगुंडी कॉम्प्लेक्स, नंदकुमार मुंदडा, सुहास झणकर, सागर भोमाज, सुलोचनाबाई भिसे, कु. मु. गुरुराज येल्लटी, उदय भागवत, शहनवाज पेशइमाम, उमाकांत पतंगे, शशिकांत कोळेकर, मे. लम्बी ब्रदर्स, बाजीराव नागावकर, प्रदीपकुमार शिंगवी, ताजोद्दिन मुजाहिद, चुंबळकर डेव्हलपर्स, रामराव निमगडेसह इतर तिघे, सत्यनारायण येलगेटी, कु. मु. राजेश गांधी, डॉ. संजीव भंडारी, डॉ. प्रमोद कुलकर्णी, राजेंद्र फाळके, डॉ. विजय रघोजी, डॉ. विजय कानेटकर, कु. मु. समीर गांधी व विपुल शहा, डॉ. अंजली चिटणीस, रवींद्र मोकाशी, मनोहर सपाटे, गोपाळ नागणे, बी. जी. ठेंगील (अजिंक्य हॉटेल).

आठ दिवसांत करणार कारवाई
पार्किंग जागेचा इतर कारणांसाठी वापर करणार्‍यांची पहिली यादी महापालिकेने जाहीर केली आहे. पार्किंगच्या जागा रिकाम्या करा, इतर बांधकाम असेल तर आठ दिवसांत काढा, अन्यथा पाडकाम करण्यात येईल असे नमूद केले आहे.’’ दीपक भादुले, बांधकाम परवाना विभागप्रमुख

नोटीस मिळाली नाही
पार्किंगच्या जागेबाबत महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही. सर्वप्रथम कागदपत्रे पाहणे आवश्यक आहे.’’ डॉ. अंजली चिटणीस

चुकीच्या पद्धतीने नोटिसा
पार्किंगच्या जागेत बांधकाम केले नाही. तसे बांधकाम केले असल्यास महापालिकेने दाखवून द्यावे. अनधिकृत बांधकाम तत्काळ पाडले जाईल. महापालिका चुकीच्या पद्धतीने नोटीस देत आहे.’’ युवराज चुंबळकर, बिल्डर आणि मनसे शहरप्रमुख

नियमाप्रमाणे आहे, उत्तर देऊ
शरद बँकेचे बांधकाम नियमाप्रमाणे केले आहे. त्यामुळे महापालिकेने नोटीस बजावली तरी त्याला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिले जाईल.’’ मनोहर सपाटे, नगरसेवक