आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपात शह-काटशह, राजकारणाला उधाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या तिन्ही शहरी मतदारसंघात भाजपमधील शह- काटशहाचे राजकारण रंगात आले आहे. उघडपणे या गोष्टी होत नसल्या तरी सुप्त पद्धतीने पक्षीय राजकारण केले जात आहे.

शहर उत्तर मध्ये विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील नाराजी दूर झाली तरी गटबाजी आहे. शहर मध्यमध्ये भाजपचा एक गट प्रा. मोहिनी पतकी यांच्या विरोधात कार्यरत असल्याचे चर्चा आहे.दक्षिण सोलापूरमध्ये भाजपकडून सुभाष देशमुख यांना उघडपणे विरोध होत नसला तरी धुसफूस आहे. शिवसेनेचे खासदार प्रा. रवी गायकवाड यांनी भाजपचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांच्यासमवेत दक्षिणचे शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर यांची भेट घेतल्याने देशमुख यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे.

- खासदार प्रा. रवी गायकवाड हे सहकारी असल्याने त्यांना कार्यालयात बोलावले होते. त्यांच्यासोबत कोण येणार हे मी कसे ठरवणार. मी पक्षाचे कार्य करणार आहे. अॅड.शरद बनसोडे, खासदार