आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर डॉक्टरवेळेवर न आल्याने रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सुरेश किशोर माथंगी (वय ४६, रा. पडापल्ली, जि. करीमनगर, तेलंगणा) असे मृताचे नाव आहे. ते दुरंतो एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. सिकंदराबादहून मुंबईला निघाली होती.
डॉक्टर सुमारे ४० मिनिटांनी आल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. तर डॉक्टर वेळेवर पोहोचल्याचा दावा रेल्वे हॉस्पिटलने केला. होटगी स्टेशनजवळ पहाटे चारच्या सुमारास माथंगी यांना हृदयविकाराचा झटका आला. नातेवाइकांनी तिकीट पर्यवेक्षकाकडे मदत मागितली. त्यांनी नियंत्रण कक्षाला कळवले पुढील सोलापूर स्टेशनवर डॉक्टरांस हजर राहण्यास सांगितले. वाजून १० मिनिटांनी गाडी सोलापूर स्टेशनवर आली. मात्र, तेथे डॉक्टरांचा पत्ता नव्हता. वाट पाहून उपस्थानक व्यवस्थापकांनी पर्यायी व्यवस्था केली आणि सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. वाटेत मृत्यू झाल्याचे सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले. पहाटे सव्वापाचला माथंगी यांना सिव्हिलमध्ये आणल्याची नोंद आहे. या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे.
- माहिती मिळताच डॉक्टर स्थानकावर आले. त्या आधी रुग्णास हलवले होते. डॉक्टर उशिरा पोचले असे म्हणणे चुकीचे आहे.”
आनंद कुमार शर्मा, मुख्यवैद्यकीय अधीक्षक, रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर
- सोलापूर स्थानकावर आम्हाला उतरवण्यात आले. तिथे बराच वेळ डॉक्टरांची वाट पाहिली. स्थानक उपव्यवस्थापक एस. डी. गजधाने यांनी दुसरी रुग्णवाहिका बोलवून दवाखान्याला पाठवून दिले. त्यांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा अाभारी आहे. मात्र वेळेत उपचार मिळाले असते तर आमच्या व्यक्तीचे प्राण वाचले असते.”
बी. रमेश गौड, मृतप्रवाशाचे नातेवाइक