आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसायात भांडवलापेक्षा चिकाटी, प्रयत्न महत्त्वाचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उद्योग व्यवसाय करीत असताना भांडवलाची अडचण असतेच. परंतु भांडवलापेक्षाही चिकाटी आणि प्रयत्न असतील तर माणूस व्यवसायात यश संपादन करू शकतो, असे प्रतिपादन खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी केले.

प्रबोधन विचार मंचच्या वतीने शनिवारी दुपारी वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या "पहिली आंबेडकरी उद्योजक परिषदे'च्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आणि व्यवसायात शून्यातून प्रगती केलेल्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी ते पुढे म्हणाले, लग्न असो किंवा घटस्फोट असो हिंदू कायद्यानुसारच होतो. याकरिता बौद्ध कायदा अस्तित्वात यायला हवा आणि त्यानुसार सर्व कामे या कायद्यानुसार व्हायला हवीत. त्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
व्यवसाय सुरू करण्यापेक्षा व्यवसायात टिकून राहणे गरजेचे असते. टिकून राहण्यासाठी चिकाटी असणे महत्त्वाचे आहे. घरच्या जबाबदाऱ्यांमुळे माणूस व्यवसायापेक्षा नोकरी करणे पसंत करतो. मात्र त्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर त्या युवकाने व्यवसायाकडे वळावे.
एमआयडीसीमधील जागा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे आश्वासन खासदार शरद बनसोडे यांनी दिले. श्री. बनसोडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना उद्योगरत्न आणि समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना पुरस्कारप्राप्त शिवराज कांबळे म्हणाले, ‘कुठलाही उद्योग करायचा असेल तर आपल्यासमोर एक आदर्श हवा असतो. मी लक्ष्मण किर्लोस्कर यांचे आत्मचरित्र वाचले आणि व्यवसाय करायचा निर्णय घेतला.’ या वेळी रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे, संस्थापक अध्यक्ष विश्वास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक करताना विश्वास गायकवाड यांनी उद्योजक परिषद आणि पुरस्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश सांगितला. अंजना सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रबोधन विचार मंचचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

प्रबोधन विचार मंचच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना उद्योगरत्न आणि समाजरत्न असे दोन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी पुरस्कारप्राप्त व्यक्तीबरोबर खासदार शरद बनसोडे, रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे, संस्थापक अध्यक्ष विश्वास गायकवाड आदी.

यांना प्रदान करण्यात आला पुरस्कार
उद्योगरत्न पुरस्कार : जगन्नाथ उपलप (उपलप मंगल कार्यालय), शिवराज कांबळे (एस. के. पाइप), जयसिंग चंदनशिवे (कुणाल मशिनरी), लक्ष्मण रणधिरे (लॉर्ड्स असोसिएट्स), रणजित लोखंडे (आर. के. न्यूज पेपर एजन्सी)
समाजरत्नपुरस्कार : अण्णासाहेबभालशंकर (आदर्श शैक्षणिक संस्था), किरण बनसोडे (आदर्श पत्रकार), बाबा बाबरे (आदर्श सामाजिक संस्था), शैलेंद्रसिंह वाघमारे (आदर्श युवा सामाजिक कार्यकर्ते)
बातम्या आणखी आहेत...