आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्ल्सच्या एजंटाने रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-पर्ल्स कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळावेत, यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी वारंवार तगादा लावल्याने या कंपनीच्या एका एजंटाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्माहत्या केली. गुरुवारी (दि. ६) दुपारी दोनच्या सुमारास कुर्डुवाडी वडशिंगे रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. मोहनलाल सूर्यभान कोकाटे (वय ५६, बाळे, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

कोकाटे हे गेल्या अनेक वर्षांपासून पर्ल्स अॅग्रोटेक काॅर्पोरेशन लिमिटेड (पीएसीएल) कंपनीचे एजंट म्हणून काम करीत होते. त्यांनी एजंट म्हणून अनेकांना पर्ल्स कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे अनेकांनी त्या कंपनीत पैसे गुंतवले. गेल्या काही दिवसांपासून पर्ल्स कंपनीत भरलेल्या पैशांची मुदत संपूनही पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे या कंपनीबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू झाली. अनेक गुंतवणूकदारांनी आपले पैसे परत मिळावे, यासाठी कोकाटे यांच्याकडे तगादा लावला. त्यामुळे त्यांनी नागरकोईल एक्स्प्रेसखाली उडी घेऊन आत्महत्या केली. रेल्वे चालकाने स्टेशन मास्तरला या घटनेची खबर दिली. स्टेशन मास्तरने कळवल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
या कंपनीत जिल्ह्यातील सुमारे 150 कोटी रुपये अडकले आहेत. मुदत संपलेल्या गुंतवणूकदारांना रकमा देण्याचे काम ऑगस्ट महिन्यापासून बंद आहे. तर गेल्या काही महिन्यापासून सोलापूरातील कार्यालयातील प्रमुखही गायब आहे. आता आपल्या रकमेचे काय होणार, या विवंचनेत गुंतवणूकदार असताना त्यांच्या तगाद्यामुळे एका एजंटाचा बळी गेला. मात्र, अद्यापही या रकमेप्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल नाही.

पर्ल्सच्या एजंटाचा मृत्यू
शहरातील पर्ल्स कंपनीच्या एका ४६ वर्षीय एजंटाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (दि. ७) रात्री ११.४५ वाजता मृत्यू झाला. दरम्यान, या घटन ेशी पर्ल्स कंपनीच्या व्यवहाराचा काहीही संबंध नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले आहे. दत्तात्रय बाबुराव मुळे (४६, रा. उमरगा) असे मृताचे नाव आहे. ते पर्ल्स कंपनीत सिनीअर इस्टेट एक्झीकेटीव्ह कन्सलटंट या पदावर कार्यरत होते. गेल्या बारा वर्षांपासून ते पर्ल्स कंपनीत वेगवेगळ्या पदांवर काम करीत होते. शुक्रवारी रात्री अचानक छातीत चमक आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले एक मुलगी आहे.