आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाझावरील हल्ल्याचा झाला निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गाझापट्टीवर इस्रायलकडून होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी अल् हक् परिषदेतर्फे शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

गेल्या 19 दिवसांत गाझापट्टीतील 796 हून अधिक जण ठार झाले तर सुमारे दीड लाख लोकांना राहते घर सोडावे लागले. त्यामुळे जगभरातील मुस्लिम संघटनांकडून इस्रायलचा निषेध करण्यात येत आहे.
गाझापट्टीवर होत असलेल्या इस्राईल हल्ल्याच्या निषेधार्थ अलहक्क परिषदेच्या वतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

सात रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि मुस्लिम समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेने एकत्र जमले. यानंतर हे हल्ले रोखून गाझापट्टी येथील जखमींना भारत देशाकडून मदत करावी, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार परदेसी मठ यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष शौकत पठाण, इम्तियाज पिरजादे, नगरसेवक पीरअहमद शेख, अब्दुल्ला डोणगावकर, अल्ताफ कुरेशी, सोहेल पठाण यांच्यासह चारशे ते पाचशे मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी सहभागी कार्यकर्त्यांनी निषेधाचा टीशर्ट परिधान केला होता.