आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Puncturing Health Engineer Ahere's Motor Air

पाण्यासाठी सोडली अभियंता आहिरेंच्या गाडीची हवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शेळगी परिसरातील धोत्रीकर वस्तीतील पाच हजार नागरिकांना दोन महिन्यांपासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी राजेंद्र चौकातील झोन क्रमांक दोन गाठले. सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे, उपअभियंता गंगाधर दुलंगे यांच्यासह झोन अधिकारी अतुल भालेराव यांना त्या परिसरात नेले. वस्तुस्थिती निदर्शनास येताच महापालिकेच्या अधिका-यांमध्येच खडाजंगी झाली. संतप्त नागरिकांनी आहिरे यांच्या टाटा सुमो गाडीची हवा सोडली.


शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करूनही पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये चीड आहे. शेळगी परिसरात पाणी येत नसल्याने नगरसेवक अविनाश पाटील, संजय कणकेसह 60 ते 70 नागरिकांनी झोन क्रमांक दोन गाठले. सार्वजनिक आरोग्य अभियंता आहिरे यांनी झोन कार्यालयात येऊन अडचणी समजून घेतल्या. त्यांना नागरिकांनी धोत्रीकर वस्ती येथे नेले. त्या परिसरात पाणी येत नसल्याने आहिरे आणि नागणे यांच्यात वाद झाला. दयानंद कॉलेज टाकीतून पाणी सोडत असल्याने उच्चदाबाने पाणी येत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन आहिरे यांनी यावेळी दिले.