आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व मोटार वाहन कायद्यानुसार परमीट असलेल्या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे अनिवार्य आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. मीटर नसलेल्या रिक्षांना 10 नोव्हेबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. मुदतीत मीटर न बसवणार्या रिक्षांचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
अ दर्जाच्या शहरी भागात राज्य परिवहन आयुक्तालयाने परमीट रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे अनिवार्य केले आहे. सोलापुरात परमीट असलेल्या 6145 रिक्षा आहेत. जुलै ते सप्टेंबर महिन्यात सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या संबंधित कडक भूमिका घेऊन कडक कारवाई केली. या कारवाईनंतर शहरातील 4430 रिक्षांना मीटर बसवण्यात आले. मात्र, अद्याप 1715 परमीट रिक्षांना मीटर लागलेले नाही. अशांना रिक्षांना कायद्याचा कडक हिसका दाखवत आरटीओने त्यांना 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. ज्या रिक्षा चालकांनी अद्याप मीटर बसविले नाहीत. त्यांनी मुदतीत मीटर बसवावे नाही तर त्यांचा परवाना रद्द होणार आहे.
2504 रिक्षांवर कारवाई
मीटर न बसवलेल्या जवळपास 2504 रिक्षांवर आरटीओने दोन महिन्यांपूर्वी कारवाई केली आहे. यात 1304 रिक्षा जप्त करण्यात आल्यात. तर उर्वरित रिक्षा इतर नियमानुसार दोषी आढळल्याने त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार वेगवेगळ्या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. रिक्षांवरील दंडात्मक कारवाईतून आरटीओला जवळपास 33 लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. त्यानंतर रिक्षाचालकांनी मीटर बसवण्यासाठी धावपळ केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.