आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल पंपावर आम्हा महिलांना मिळते आदर-सन्मानाची वागणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पेट्रोल भरण्यासाठी भली मोठी रांग असली तरी मंगळवार बाजारातील चडचणकर स्वामी पेट्रोल पंपावर महिला व युवतींना ‘डोन्ट वेट अँण्ड वॉच’, डायरेक्ट स्वतंत्र रांगेत उभे राहून पेट्रोल भरण्याची सुविधा आहे. महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचा हा अनोखा उपक्रम महिलांना दिलासा देणारा आहे. नोकरी व कामाच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या महिला पेट्रोल भरण्यासाठी या पंपावर येतात तेव्हा त्यांना फार वेळ रांगेत उभे राहवे लागत नाही. केवळ पाच मिनिटांत पेट्रोल भरून मिळते.

चार मशीन असलेल्या या पंपावर महिला जेव्हा प्रवेश करतात तेव्हा त्यांना पंपावरील कर्मचारी एक नंबरच्या पंपावर येण्याची विनंती करतात. त्यानंतर कितीचे पेट्रोल भरायचे आहे याची चौकशी करून गाडीची डिक्की उघडून पेट्रोल भरून गाडी पूर्ववत हातात देऊन शुभेच्छा दिली जाते.

लवकर सेवा मिळते
पंपावर लवकर सेवा मिळते. त्यामुळे कुठेही पेट्रोल संपले की मी पुन्हा याच पंपाच्या दिशेने धावते. गडबडीच्या काळातही येथे आपल्याला पेट्रोल लवकर मिळेल याची खात्री असते.’’
-राजश्री आडम, विद्यार्थिनी

सेवेचे समाधान वाटते
ताईच्या हातून गाडी घेतो तेव्हा त्या नि:श्वास सोडताना पाहायला मिळतो. ते पाहून आपण आपल्या सेवेने धावपळ करणार्‍या ताईंना थोडा तरी आधार मिळतो, याचे समाधान वाटते.’’ दीपकसिंग पवार, पेट्रोल पंप कर्मचारी

कष्ट करणार्‍या हातांना मदत
महिला नोकरी आणि दिवसभर विविध कामांत व्यस्त असतात. त्यांचा थकवा काही क्षणांसाठी दूर गेला तर सेवेचे व्रत पूर्ण होत झाल्याचे समाधान प्राप्त होईल, असे वाटते.’’
-योगेश चडचणकर, संचालक

चार वर्षांपासून सेवा
2006 मध्ये सुरू झालेल्या या पंपावर सुरुवातीच्या काळात महिलांचे येण्याचे प्रमाण अधिक होते. दिवसाकाठी 60 ते 70 महिला पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येत असत. संचालक योगेश चडचणकर यांनी महिला फार काळ पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असल्याचे पाहिले आणि त्यांनी दुसर्‍याच दिवसापासून महिलांसाठी स्वतंत्र रांग सुरू केली. आज या पंपावर 150 हून अधिक महिला पेट्रोल भरण्यासाठी येतात. घर, मुलं, नोकरी अशा व्यापात गुरफटलेल्या महिलांसाठी अशी सेवा इतर पंपांवरही मिळाल्यास सोय होईल.

आदर्श पेट्रोल पंप
"महिलांचा विचार करणारा हा आदर्श पेट्रोल पंप आहे. इथे आल्यानंतर काही क्षणात गाडीत पेट्रोल भरून मिळते. शिवाय महिलांची स्वतंत्र रांग असल्याने आदर ठेवल्याचे कौतुक वाटते.’’
-विद्या कुंभार, शिक्षिका

महिला विश्व
पेट्रोल पंपावर आहे महिलांसाठी स्वतंत्र रांगेची सोय, सहा वर्षांपासून सुरू आहे सेवा, फार वेळ रांगेत उभे राहवत नसल्याने ग्राहकांनी व्यक्त केले समाधान