आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बार असोसिएशनने दाखल केली जनहित याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वॉरंट रद्द करण्यासाठी लाच घेणार्‍या वकिलाला अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयातील वकिलांनी गुरुवारी कामात सहभाग घेतला नाही. याबाबत झालेल्या निषेध सभेत वकिलांवर कारवाई करण्यापूर्वी बार असोसिएशनशी चर्चा करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव झाला. अशा घटना पुढे घडू नयेत म्हणून कृती समिती नियुक्त करण्यात आली.


अँड. एम. सी. काझी यांना पैसे घेताना बुधवारी पुण्याच्या सीबीआय पथकाने अटक केली. यात घाई झाल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. यात मुख्य आरोपी हा रेल्वे पोलिस दलातील भैरवडगी नावाची व्यक्ती आहे. ती फरार आहे. त्यांना सोडून सीबीआयने काझी यांच्यावर कारवाई केली. ती निषधार्ह असल्याचे बारचे अध्यक्ष शिवशंकर घोडके म्हणाले. रेल्वे दलातील कर्मचार्‍याला अटक करा, त्याला निलंबित करा अशा मागण्या या सभेत मांडण्यात आल्या.


यापूर्वी असेच..
1 यापूर्वी बारचे उपाध्यक्ष अँड. संतोष न्हावकर यांच्याबाबतही असाच प्रकार झाला. त्या वेळीही वकिलांनी आंदोलन करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.
2 त्यानंतर त्यांच्यावरील गुन्हा रद्द झाला. यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी वकिलांची कृती समिती असलीच पाहिजे, अशी मागणी बैठकीत झाली.
3 बारचे अध्यक्ष अँड. घोडके, सचिव अँड. महेश जगताप, सहसचिव अँड. स्वाती बिराजदार, अँड. रमेश कणबसकर, अँड. सुरेश गायकवाड, अँड. एच. एम. अंकलगी, अँड. पी. बी. गायकवाड, अँड. अब्बास काझी आदींनी या वेळी मते मांडली.
कृती समिती सदस्य असे
बारचे अध्यक्ष शिवशंकर घोडके हे कृती समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. समितीच्या इतर सदस्यांची नावे अशी : (सर्व अँड.) रजाक शेख, जी. एस. आडम, जी. एन. राजपूत, व्ही. डी. कट्टे, व्ही. एस. आळंगे, संजीव सदाफुले, प्रदीप राजपूत, मंगला चिंचोळकर, शर्मिला देशमुख, इनायत अली शेख.