आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाचा होतोय -हास, उच्च न्यायालयात दाखल झाली जनहित याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पर्यावरण विभागाने मंजुरी दिल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच ५० ठिकाणच्या वाळूचे लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये ठिकाणचे लिलाव ठेकेदारांनी घेतले असले तरी यातील दोन ठिकाणच्या लिलावप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिकेत वाळू वाहतुकीने रस्ते उखडतात, पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो तर प्रचंड प्रमाणात वाळू उपसा केल्याने आम्हाला प्यायला पाणीही मिळत नाही, असे मुद्दे याचिकाकर्त्यांनी मांडले आहेत. उच्च न्यायालयाने लिलावास स्थगिती दिल्याने ठेकेदारास ताबा देताना कोणतीही अडचण येणार नसल्याचे महसूल उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी स्पष्ट केले.

यंदाच्या वाळू लिलावामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर-सिद्धापूर येथील ठेका रद्द करण्यासाठी तानाजी वाघचवरे तर सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील ठेक्याप्रकरणी श्री. दिघे यांनी याचिका दाखल केली आहे. शिवाय, मागील वर्षी लिलाव झालेले घाटणे-भोयरे अर्धनारी येथील वाळू लिलावा प्रकरणामध्येही याचिका दाखल करण्यात आली आहे. घाटणे-भोयरे येथील वाळू लिलाव रणजित भोसले यांनी घेतला होता, परंतु ठेक्यांची पूर्ण रक्कम भरली नसल्याचे त्यांची २५ टक्के अनामत रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम परत मिळण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे तर अर्धनारी येथील ठेक्यास महिने मुदतवाढ दिल्याच्या कारणामुळे प्रशांत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. या चारही याचिकेवर प्रशासनाने म्हणणे मांडले आहे.