आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pilot Project For The Industry Starts In Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योगांना सुविधा देण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार सोलापूरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सध्याच्या योजनांमधून 117 उद्योगांना अर्थसाहाय्य देण्यात येते. त्यात आणखी नव्या उद्योगांचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोलापुरात क्लस्टर (उद्योगांच्या सामूहिक सुविधा) चा पायलट प्रोजेक्ट प्रस्तावित आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये ग्रामउद्योगाला चालना मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटील म्हणाले की, 1962 पासून सुरू असलेल्या खादी ग्रामउद्योग मंडळातील योजना आणि कारभार आता नव्या जगाच्या आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार बदलावयास हवा, या अनुषंगाने येत्या दोन- तीन महिन्यात या मंडळात नवा पॅटर्न राबविण्यात येईल.

समाजव्यवस्थेसोबत कारागीर आणि बलुतेदारांचे प्रश्‍न बदलत आहेत, असेही ते म्हणाले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात बलुतेदारांचा मेळावा घेण्यात येणार आहे. पुणे, सांगली नंतर रविवारी सोलापुरात मेळावा झाला. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, विशेष घटक योजना, मधमाशा पालन उद्योग, कारागीर रोजगार हमी योजना या योजनामध्ये असलेल्या किचकट अटी शिथील करून लाभार्थींना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी वाढीव निधीचीही तरतूद करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


ग्रामोद्योगाला मिळणार चालना
1 कोटी 18 लाखांची थकबाकी

> सोलापुरातील एकूण 1040 सभासद आहे.
> त्यांना एकूण 85 लाख 80 हजार रुपयांची मुद्दल आणि 32 लाख 88 हजार रुपये असे एकूण 1 कोटी 18 लाखांची थकबाकी आहे.
> 2008 - 12 पर्यंतची ही थकबाकी आहे. तर राज्यात एकूण 102 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
> त्यामुळे थकबाकीच्या वसुलीसाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.


2500 जणांना रोजगार उपलब्ध
खादी ग्रामउद्योगाने आतापर्यंत 2500 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. गेल्या चार ते पाच वर्षात एकूण 330 उद्योगांना या योजनांच्या माध्यमातून 15 कोटी रुपयाचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तसेच उपकरणासाठी विशेष तरतुदीतून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंदा सोलापुरातून 329 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.


तरुण पिढीला रोजगार
सध्या बलुतेदारीच्या व्यवसायात बर्‍याच अडचणी आहेत. पूर्वीचा वडिलांचा व्यवसाय करण्यास तरुण तयार होत नाही. त्यामुळे या चळवळीला पुन्हा वाढीस लागण्यासाठी विशेष योजनाद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवून तरुणांना स्वयंपूर्ण बनविण्यास मंडळ प्रोत्साहन देणार आहे.