आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन जलवाहिनी बीओटीवर केल्यास सापडतील अनधिकृत नळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - टाकळी ते सोलापूर ही समांतर जलवाहिनी बीओटी तत्त्वावर टाकल्यास महापालिकेचे 67 कोटी रुपये वाचतील. त्यामुळे महापालिकेवर पडणारा आर्थिक बोजा कमी होईल. याशिवाय नागपूर पॅटर्नप्रमाणे बोगस नळ शोधण्याची जबाबदारी संबंधित कंपनीने घेतल्यास त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न 84 कोटी रुपयांनी वाढू शकेल.

शहरात 25 हजार बोगस नळ
शहरात 92 हजार मिळकती असून, नळ कनेक्शनची संख्या 25 हजारांनी कमी आहे. अनेक व्यावसायिक कनेक्शन घरगुती स्वरूपाचे आहेत. त्यामुळे मनपाचे आर्थिक उत्पन्न कमी होत आहे. 25 हजार बोगस कनेक्शन शोधल्यास मनपाचे 77 कोटी रुपये कोटेशन आणि 7 कोटी पाणीपट्टी असे 84 कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा होतील.
देखभालीची मिटेल कटकट
टाकळी ते सोलापूर नवीन जलवाहिनी बीओटीवर केल्यास नवीन जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे संबंधित कंपनी करेल. त्यामुळे महापालिकेवर त्याचा भार राहणार नाही. बीओटीबाबत चर्चा झाल्यास त्यावर मार्ग निघू शकतो. अशी पद्धत नागपूरच्या महापालिकेने अमलात आणली आहे.