आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Plantation In Solapur Bye Divya Marathi Newspaper

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरात ‘दिव्य मराठी’ लावणार 71 हजार रोपे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जगभरातल्या देशांवर सध्या जलवायू परिवर्तनाचे संकट आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. कोपनहेगन इथे डिसेंबर 2009 मधे झालेल्या वैज्ञानिक परिषदेत जगातील 70 देशांचे जवळपास दोन हजारपेक्षा जास्त वैज्ञानिक सहभागी झाले होते. ग्रीन हाऊसमधून अत्याधिक प्रमाणात वायू उत्सर्जन होत असल्यानेच जगासमोर हे संकट उभे राहिले आहे, असाच या परिषदेतील वैज्ञानिकांचा सूर होता. याच कारणामुळे वैश्विक तापमानात सातत्याने वाढ होऊन पर्यावरणाचे चक्रही बिघडते आहे, असे मतही या परिषदेतील वैज्ञानिकांनी व्यक्त केले. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने तापमानात वाढ होत आहे आणि सन 2020 पासूनच याचे भयानक परिणाम दिसायला सुरुवात होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय. जलवायू परिवर्तनाच्या विनाशकारी परिणामांपासून वाचवण्यासाठी जनजागृती निर्माण करण्याचे काम रेडक्रॉस, रेड क्रिसेंट यांसारख्या जागतिक स्तरावरील संस्था करत आहेत. ‘जाणून घ्या धोक्याचा इशारा - वेळीच उपाययोजना करा,’ हे तर या संस्थांचे घोषवाक्य आहे. जगभरातील जवळपास शंभर मिलियन नागरिक समुद्रकिनारी वास्तव्य करतात, तापमानवाढीच्या दुष्परिणामांना याच लोकांना सगळ्यात आधी सामोरे जावे लागणार आहे.
आपल्या देशाच्या एकूण भूमीपैकी केवळ 11 टक्के क्षेत्रच जंगलाने व्यापलेले आहे. मोठय़ा प्रमाणावर होणार्‍या जंगलतोडीमुळे जलवायू परिवर्तन घडून येत आहे. पर्यावरणातील या बदलांमुळेच भविष्यात देशातल्या काही भागांत पूरसदृश परिस्थिती आणि काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. एकूणच जागतिक तापमानात सतत होणारी वाढ लक्षात घेता यासाठी आतापासूनच ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
जगातल्या अनेक देशांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. ‘बिलियन ट्री’ अभियानात भारतासहित जगभरातील 166 देश सहभागी झाले आहेत. या अभियानांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवणार्‍या देशांच्या यादीत भारत आठव्या क्रमांकावर आहे. भारतातील उत्तर प्रदेशाने या बाबतीत चांगला विक्रम नोंदवला आहे. उत्तर प्रदेशात एका दिवसात 10.5 मिलियन रोपं लावण्यात आली आणि या अभियानात सहा लाख लोकांनी योगदान दिले. वृक्षारोपणात भारताला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी तुमच्या-आमच्या सक्रिय सहभागाची गरज आहे.