आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाडेवाढ नको असेल तर गाळे रिकामे करा, मनपा आयुक्तांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील महापालिका शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या भाड्याची मुदत संपली आहे. गाळेधारकांनी 1 मार्च 2010 पासून भाडेवाढीच्या हिशेबाने रक्कम भरावी, अन्यथा गाळे रिकामे करावेत, अशा इशारा महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिला आहे. परस्पर गाळा कोणालाही हस्तांतर करता येणार नाही, त्यांनी महापालिकेकडे तो परत करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. गाळेधारक त्यांना भेटायला गेले होते. आयुक्तांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

मनपाचे शहरातील 19 शॉपिंग सेंटरचे 9 वर्षे 11 महिन्यांच्या कराराने 663 जणांना गाळे देण्यात आले. त्यांची मुदत सन 2002, 2007 आणि 2010 रोजी संपली. त्यानंतर शासकीय दरानुसार भाडेवाढ करण्याचा निर्णय स्थायीत घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेने 1 मार्च 2010 पासून वाढीव भाडे आकारणीची नोटीस दिली. त्यास व्यापार्‍यांचा विरोध आहे. व्यापार्‍यांशी चर्चा करण्यासाठी आयुक्त गुडेवार यांनी सुमारे 100 शॉपिंग चालकांची बैठक घेतली.

मनपा गाळ्यांची 2010ला झाली भाडेवाढ


अडचणींकडे दुर्लक्ष
शॉपिंग सेंटरमध्ये मूलभूत सुविधा नाहीत, इमारत गळत आहे, पाण्याची सोयी नाही आदी तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. शॉपिंग सेंटर दुरुस्ती मनपा करणार आहे. त्यासाठी पुढील अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले.


पार्क स्टेडियमचे काय?
महापालिका आयुक्त मनपा शॉपिंग सेंटर गाळय़ांची भाडेवाढ करत असताना स्टेडियम कमिटीच्या ताब्यात असलेल्या पार्क स्टेडियम येथील गाळय़ांच्या भाडेवाढीकडे दुर्लक्ष केले.


आमच्या अडचणी कोण ऐकणार?
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची शुक्रवारी गाळेधारक व्यापार्‍यांनी भेट घेतली. त्यांच्या अचडणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही व्यापारी म्हणाले की, अडचणी ऐकून घेणे अपेक्षित होते. त्यांनी आमचे ऐकून घेतले नाही. त्यांचेच मत सांगितले. आमच्या काही अडचणी आहेत, त्या कोण सोडवणार? त्यांनी ऐकावयास हवे होते.


पुढार्‍यांचे गाळे
महापालिकेच्या गाळय़ांचे मालक बहुतेक राजकीय पुढारी, राजकीय कार्यकर्ते किंवा त्यांच्या हितसंबंधितांचे असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गाळे भाडेवाढीस विरोध होण्याची शक्यता आहे.


परस्पर हस्तांतर केले तर रद्द करणार
परस्पर गाळे व्यवहार झाल्यास ते रद्द करण्यात येईल. परस्पर गाळा हस्तांतरण करता येणार नाही. तसा अधिकार गाळे धारकांना नाही. त्या गाळय़ाची विक्री महापालिका करणार आहे. गाळेधारकांचे काय ऐकून घ्यायचे?’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका