आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ला सोलापुरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील विविध शहरांमध्ये विकासकामांचा प्रारंभ करणार आहेत.
श्री. मोदी हे 16 ऑगस्ट रोजी सोलापूर तर 21 रोजी नागपूर दौ-यावर असतील. मोदी यांच्या सोलापूर दौ-याच्या वृत्तास जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दुजोरा दिला आहे.

लिंबीचिंचोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील पॉवर ग्रीडचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिवाय नागपूर-सोलापूर-रत्नागिरी व सोलापूर-हैदराबाद या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रारंभही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दौ-याचा अधिकृत कार्यक्रम आला नसला तरी संबंधित विभागाकडून तशा प्रकारचे नियोजन करण्यात येत आहे. दौ-याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास अद्याप कोणतेही पत्र आले नसल्याचे श्री. गेडाम यांनी सांगितले.